श्री क्षेत्र चाकरवाडी ही भूमी पावन आहे संजीवनी ताई शिंगाडे यांचे प्रतिपादन
बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी सद्गुरू संत श्री बाळूमामा यांच्या पालखी क्रमांक 9 विसाव्याला थांबलेली आहे.पवित्र पावलानं शुद्ध झालेली पावन झालेली आपली ही चाकरवाडी ची भूमी आणि या भूमीमध्ये आज जगाचा बाप विसाव्याला थांबलेला आहे.आपल्या गावामध्ये माऊली महाराज समाधीस्थ आहे या जमिनीचे हे भाग्य आहे या भूमीचे हे भाग्य आहे या पंचक्रोशीचे भाग्य आहे तुम्हा सगळ्यांना माऊलींचा सहवास लागतोय. या भूमीमधले सर्वच भाग्यवान आहात आणि या भूमीमध्ये आज जगाचा बाप येऊन विसाव्याला थांबले आहेत आणि तोही विशेष पर्वकाळी शुद्ध फाल्गुन एकादशीला,अर्थात फाल्गुन मध्ये एकादशीला मामांचा भंडारा उत्सव असतो. या भंडारा उत्सवामध्येच बाळूमामांची पालखी आपल्या गावामध्ये आली म्हणजे पूर्वी जन्मीचे पुण्य या गावाने कमावलेले आहे. बाळूमामा आणि संत ज्ञानेश्वर माऊली महाराज एकच आहेत. या विसाव्याला थांबलेल्या पालखी सोहळ्यामध्ये तिसऱ्या दिवशी नातेपुते येथील संजीवनी ताई शिंगाडे यांनी आपली कीर्तन सेवा संपन्न केली. या कीर्तन श्रावणेतून भाविकांना मुक्तीचा संदेश दिला. महाराजांनी जगद्गुरु संत श्री तुकोबाराय यांच्या उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली या अभंगावर ते चिंतन केले. उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटीं सांठवूं तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला.
महाराज सांगतात माझे भाग्य उजळले कारण मला संतांचे दर्शन झाले त्यामुळे माझी सर्व चिंता नाहीशी झाली. आणि संतांच्या दर्शना मुळेच पद्मनाभ असा जो हरी त्याचा मला लाभ झाला.मी आपल्या संपुष्ट अशा हृदयरूपी पेटीत देवाला साठवून किंवा सुरक्षित ठेवीन.तुकाराम महाराज म्हणतात देवरूपी ठेवा हा तर माझ्याठीकाणी पहिल्या पासूनच होता,पण तो माझ्या शुध्द भावनेने सापडला.
आपल्या गावात जगाचा बाप विसाव्याला थांबला इथे भंडारा उत्सव साजरा होतो ही महत्त्वाची गोष्ट आहे हे सहजा सहजी कुणाच्याही भाग्यांमध्ये नसते आपली भूमी पावन आहे त्यामुळे सगळं घडतं की आज जगाच्या बापाचा उत्सव आपल्या गावामध्ये घडतोय.
मामा कोण आहे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा दैवत कैलासीचे भगवान शंकर पार्वती मातेचे पती, गणपती बाप्पा आणि कार्तिकी यांचे पिता नंदिकेश्वराचे स्वामी देवांचे देव महादेव काळाचे काळ महाकाळ अनाथांचे नाथ गरिबांचे नाथ भक्तांचे कैवारी जया सृष्टीची निर्मिती करतात या सृष्टीचा प्रहार सृष्टीतील प्रत्येक जीवाला तुमच्या आमच्या आत्म्याचे पालन करणारे म्हणजे मामा आहेत. अशा प्रकारच्या मामांच्या आठवणींना ताईंनी उजाळा दिला आणि भक्तांना मामा कोण होते हे आपल्या कीर्तन श्रवणेतून समजून सांगितले. मामांचा प्रवास, मामा कोण होते, मामा देव होते अशाप्रकारे ताईंनी भाविकांना संदेश दिला. यावेळी पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.