युवा सेनेचा विजय दौरा वैजापूर येथे शेकडो युवा सैनिकांच्या उपस्थितीत संपन्न.
वैजापूर – महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि युवासेना मार्गदर्शक श्रीकांत शिदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, सचिव किरण साळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवानेत्या व युगंधर सेवाभावी संघटना अध्यक्ष हर्षदा ताई शिरसाट, युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे, युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव (दादा) चव्हाण, मराठवाडा युवती निरीक्षिका आकांक्षा चौगुले, युवासेना मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने युवा विजय दौरा वैजापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मा. आमदार रमेश बोरनारे आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे, आणि पक्षाचे संघटन अधिक मजबूत होत आहे. वेळोवेळी शिवसेना पदाधिकाऱ्या मार्फत व युवा सैनिकांमार्फत राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमामुळे पक्षाचे बळकटीकरण वेगाने होत आहे. येथील पदाधिकाऱ्यांचे कार्य पाहून उत्साह वाढला असून युवासेनेची बांधणी ही कशा प्रकारे असावी याचे उत्तम उदाहरण वैजापूर येथे दिसून आले. या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख भरत कदम, युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी भगुरे, युवासेना जिल्हा समन्वयक आमीर अली, शिवसेना शहर प्रमुख पारस घाटे, शिवसेना नगरसेवक ज्ञानेश्वर टेके, युवासेना तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष सूर्यवंशी, युवासेना तालुका समन्वयक गणेश निकले, युवासेना तालुका संघटक मंगेश जाधव, युवासेना उप तालुकाप्रमुख राहुल शेळके, मा. संजय बोरनारे, युवानेत्या अचोली बोरनारे, युवासेना माजी जिल्हाप्रमुख (बीड) अजय सुरवसे, युवा सेना माजी जिल्हाप्रमुख (बीड) सुमित कोळपे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख महादेव मातकर व इतर शेकडो शिवसैनिक युवा सैनिक यावेळी उपस्थित होते.