जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वेळेवर उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
- जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वेळेवर उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
- बीड प्रतिनिधी : बीड तालुक्यातील बाळापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक उशिरा येण्याचे प्रमाण वाढले असून याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. वेळेवर वर्ग न भरल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला असून, सकाळी ९ ते १२ या वेळेत शाळा भरत आहे. मात्र, बाळापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक वेळेवर पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
- स्थानिक रहिवाशांच्या मते, शाळेतील काही शिक्षक नियमितपणे उशिरा पोहोचतात, त्यामुळे पहिल्या काही तासांमध्ये विद्यार्थी वाऱ्यावर सोडले जातात. अनेक वेळा पालकांनी याबाबत तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.शाळेतील व्यवस्थापनाने यावर लक्ष घालण्याची मागणी होत असून संबंधित शिक्षण विभागाने याची तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
error: Content is protected !!