वसंतराव काळे महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त सेवा गौरव सोहळा
बीड | प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त दि. 08 रोजी सकाळी 11:30 वाजता सेवा गौरव सोहळा वसंतराव काळे महाविद्यालय, बीड येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती , राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून केली तसेच सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज व जगदगुरु तुकाराम महाराज यांची मूर्ती देऊन सर्व पाहुण्याचं स्वागत केले . सत्कारमृर्ती मा. सौ. संध्याताई बारगजे ( संचलिका: इन्फंट इंडिया, आनंदग्राम, पाली बीड ) , मा. सौ. सिमाताई ओस्तवाल ( अध्यक्षा : गुरू आनंद महिला प्रतिष्ठान, बीड ) , मा. सौ. अनिताताई भोसले ( सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार, बीड ) आणि मा. सौ. मनिषाताई पवार ( अध्यक्षा: आपला परिवार अनाथ वृध्दाश्राम, कळसंबर ) मा.श्री. सतिश कदम ( नायब तहसीलदार )तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. रमेशभाऊ पोकळे( अध्यक्ष: कै अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्था,चांदेगाव,ता.जि .बीड ) प्रा. बप्पासाहेब हावळे व कर्मचारी वर्ग तसेच विदयार्थी आणि विदयार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. सौ. मनीषाताई पवार यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना परिस्थिती कशी ही असो इच्छा असेल तर सर्व शक्य आहे असे ही त्यांनी सांगितले. मा. सौ. सिमाताई ओस्तवाल यांनी देणारे बना, घेणारे नाही अस देखील विदयार्थ्यांना सांगितलं. मा. सौ. अनिताताई भोसले यांनी महीला दिन साजरा का करावा याविषयी सविस्तर माहिती सांगितली. आणि मा. सौ. संध्याताई बारगजे यांनी देखील मार्गदर्शन केले. मा. श्री. रमेशभाऊ पोकळे यांनी अध्यक्षीय भाषण केले तसेच प्रा, बप्पासाहेब हावळे यांनी देखील विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन सौ. जगताप यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. सय्यद यांनी केले.