येळंबघाट मध्ये मोठा अपघात:,सुदैवाने जीवित हानी टळली.
- येळंबघाट मध्ये मोठा अपघात:,सुदैवाने जीवित हानी टळली..
- बीड प्रतिनिधी: बीड तालुक्यातील येळंब घाट येथील रमेश कुंभार यांच्या चहाच्या हॉटेलमध्ये मांजरसुंब्या कडून येणारे मोठे कंटेनर हॉटेलमध्ये घुसले आणि एकच खळबळ उडाली,कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठा आवाज झाला यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली.
- सुदैवाने हॉटेलमध्ये त्यावेळेस कोणी नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु हॉटेलचे खूप नुकसान झाले.अपघाताची माहिती मिळताच अपघात स्थळी नेकनूर पोलीस स्टेशनचे पीएसआय मुकुंद ढाकणे व नेकनूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी धाव घेतली या अपघातामध्ये कंटेनर चालक जखमी झाला असून कंटेनर चालकास स्त्री रुग्णालय नेकनूर या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.
error: Content is protected !!