डिजिटल मीडिया परिषदेच्या बीड तालुकाध्यक्षपदी अभिजीत पवार यांची निवड..
- डिजिटल मीडिया परिषदेच्या बीड तालुकाध्यक्षपदी अभिजीत पवार यांची निवड..
- कार्याध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, तर उपाध्यक्षपदी दीपक वाघमारे यांची वर्णी
- बीड प्रतिनिधी : मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांनी बीड तालुकाध्यक्षपदी अभिजीत पवार, कार्याध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, उपाध्यक्षपदी दीपक वाघमारे तर सचिवपदी शेख समद यांची निवड जाहीर केली आहे. प्रिंट मीडिया सोबतच डिजिटल मीडियाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याने, या पुढील काळात प्रत्येक घटना आणि माहिती तात्काळ वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आणि त्यासोबतच डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकारांच्या हितासाठी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी डिजिटल मीडिया परिषद स्थापन केली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांनी दिनांक 3 मार्च 2025 रोजी डिजिटल मीडियाची बीड तालुका कार्यकारणी पुढील दोन वर्षासाठी जाहीर केली आहे. यात तालुकाध्यक्षपदी- अभिजीत पवार, कार्याध्यक्ष- लक्ष्मण गायकवाड, उपाध्यक्ष- दीपक वाघमारे, सचिव- शेख समसाद तर संघटकपदी- अरबाज आतार खाजामिया यांचा समावेश आहे.
- बीड तालुक्यात यूट्यूब चैनल, इंस्टाग्राम, फेसबुक, ब्लॉग, व्हाट्सअप, ऑनलाइन दैनिक यासह वेगवेगळ्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून शेकडो पत्रकार काम करत आहेत. त्यांना संघटित करून योग्य दिशेने आणि सुसूत्र पद्धतीने डिजिटल मीडियाचे काम व्हावे. त्यासोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला सुरक्षा देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी डिजिटल मीडिया परिषद काम करत आहे. यासाठी बीड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांनी करून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!