तीन चिमुकल्यांचा पहिला रोजा पुर्ण
कडा प्रतिनिधी – मुस्लिम धर्माच्या पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लिम समाजातील लहान चिमुकल्यांना वगळून इतर सर्वांना रोजा (फर्ज) सक्तीचे असतात. परंतु घरात पालकांचे पाहून हे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा धरतात. अश्याच प्रकारे आष्टी तालुक्यातील कडा येथील तीन चिमुकल्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला रोजा काटेकोरपणे पुर्ण केला आहे. यावर्षीचा पवित्र रमजान महिना शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजीच्या सायंकाळ पासून आरंभ झाला. या पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा रविवार दि.२ मार्च रोजी होता. हा पहिला रोजा आष्टी तालुक्यातील कडा येथील इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या कु.तस्कीन इजाज सय्यद (वय ९ वर्ष),कु.कुलसूम रहेमान सय्यद (वय ९ वर्ष) आणि इयत्ता चौथीत शिक्षण घेणारा कासिम रहेमान सय्यद (वय १० वर्ष) या तीन बहिण -भावांनी धरला होता. या तिघांनी ही दिवससभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंबही न घेता काटेकोरपणे आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी पुर्ण केल्याबद्दल नातेवाईक व इतरांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.