शासकीय अध्यापक विद्यालय नेकनुर येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा.!
- शासकीय अध्यापक विद्यालय नेकनुर येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा.!
- बीड प्रतिनिधी : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानानाकडे आकर्षित करने’ भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या प्रसंगी शासकीय अध्यापक विद्यालय नेकनूर येथे 28 फेब्रुवारी 2025 रोजी डी.एल.एड द्वितीय वर्षातील अध्यापकांनी विज्ञान मंडळ स्थापन करून जि.प.कें.प्रा.शाळा विठ्ठलपेठ नेकनूर व जि.प.कें.प्रा.कन्या शाळा नेकनूर तसेच जि.प.माध्यमिक शाळा नेकनूर मधील शिक्षक व विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
- याप्रसंगी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनातील विविध प्रयोगाव्दारे आपल्या ज्ञानात भर टाकल्याचे दिसून आले.लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो. मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलम प्रयत्न आणि कृत्ये प्रदशिर्त करणे, सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरे केले जाते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अब्दुल नजीब सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्रीम.नलावडे मॅडम या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री.पुजारी सर व श्री.धोंडगे सर तसेच सांस्कृत विभाग प्रमुख श्री.पट्टेवाड सर उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात श्रीनिवास चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली. यानंतर विज्ञान मंडळाच्या कार्यकारिणीचे अनावरण करण्यात आले.तसेच विज्ञान मंडळाचे अध्यक्ष नागरगोजे दिपाली, उपाध्यक्ष रोहन बोराडे, सचिव प्रज्ञा काळे, उपसचिव सुहानी पायाळ,कौशअध्यक्ष शेख महेक ,उपकौशअध्यक्ष वंजारे दिक्षांत, बातमीदार अरुण वाळेकर, प्रसिद्धकार तांगडे आरती, छायाचित्रकार चादर ओंकार, आणि विज्ञान मंडळ मार्गदर्शक – श्री.एस.आर.धोंडगे सर कार्यकारिणी जाहीर करून विज्ञान विषयाची सर्जनशीलता, निट नेटकेपणा सादरीकरण विज्ञानाची उपयुक्ता व नाविन्यता या पाच निकषांच्या आधारे स्पर्धेचे आयोजन केले होते.
- सहभागी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे विविध प्रयोगांच्या माध्यमातून स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेचा निकाल परिक्षक कु.मोहिनी करांडे, तांगडे क्रांती ,सायली सूर्वे, सुमंत खिंडकर यांच्या मार्फत जाहीर करण्यात आला. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक सभा पठाण , द्वितीय क्रमांक शेख सदफ, तृतीय क्रमांक सर्वज्ञ दिक्षा या , विद्यार्थ्यांनीने पटकावला आहे.स्पर्धेचे बक्षीस वितरण विज्ञान मंडळाच्या सदस्यांनमार्फत करण्यात आले.यानंतर अध्यक्षांनी त्यांचे मार्गदर्शन व्यक्त केले.व शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
error: Content is protected !!