24.7 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी फार्मर आयडीच्या कामाचा घेतला आढावा!

  • तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी फार्मर आयडीच्या कामाचा घेतला आढावा!
  • ज्ञानदा सेतू केंद्र- सीएससी केंद्राला तसेंच तलाठी सज्जाला दिली भेट..
  • बीड प्रतिनिधी : श्री. चंद्रकांत शेळके तहसीलदार बीड यांनी येळंब घाट मंडळातील तलाठी कार्यालय व सीएससी केंद्रा ला भेट देऊन शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या ॲग्रीस्टेक- फार्मर आयडी विषयीच्या कामाचा आढावा घेतला. व सी एस सी केंद्र चालकांना तसेंच तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांना फार्मर आयडी विषयीचे मार्गदर्शन केले.
  •  सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावा.. फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाचा असून पिकविमा,अनुदान पी एम किसान,नमो शेतकरी, तसेच शेतीविषयक विविध योजनेसाठी यापुढे फार्मर आयडीची आवश्यकता असणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा तसेच सीएससी केंद्र चालकांनी सर्व शेतकऱ्यांना सांगून त्यांचे फार्मर आयडी काढून द्यावेत असे आवाहन तहसीलदार शेळके यांनी केले.यावेळी तलाठी नलावडे, तलाठी जोगदंड मॅडम,मंडळ अधिकारी आघाव मॅडम,ग्राम महसूल सेवक कैलास मोराळे,निखिल राऊत,सज्जा आंबील वडगाव चे ऑपरेटर सीएससी केंद्र चालक तांदळे,सीएससी केंद्र चालक जाधव,सीएससी केंद्र चालक-शंकर कदम,तसेच सीएससी केंद्र चालक-पत्रकार दीपक वाघमारे तसेच शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!