- अंधापुरी घाट जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.!
- बीड, दि,२७- बीड तालुक्यातील अंधापुरी घाट येथील जि प प्रा शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले..प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या कलागुणांचा प्रत्यक्ष विकास व्हावा यासाठी जि प प्रा शाळा यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी संपन्न झाले..
- स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री महेश मोटे केंद्रीय मुख्याध्यापक रौळसगाव तसेंच श्री विजय खोसे संचालक शिवाजी महाराज शिक्षक पतसंस्था बीड यांच्या हस्ते जिजाऊ व सावित्रीबाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले.. यावेळी सरपंच,उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख जगताप, जि प प्रा शाळा चे मुख्याध्यापक जगदाळे सर, सहशिक्षक जाधव सर,महेश जगताप सर,पत्रकार दिपक वाघमारे,कार्यक्रमाला आलेले मान्यवर तसेंच गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
- शाळेतील विद्यार्थ्यांनी कलाविष्काराची अनेक गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.. गाण्यावर पालकासह उपस्थितांनी दाद दिली.. कार्यक्रमासाठी चिमुकल्यांनी केलेली वेशभूषा रसिकांचे.. लक्ष वेधून घेत होती..ग्रामस्थ व प्रेक्षकांनी तसेंच पालकांनी विद्यार्थ्यांना भरघोश बक्षीसे देत त्यांचे मनोबल वाढवले.. सहशिक्षक जाधव सर यांनी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानले..
- कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सहशिक्षक जाधव सर, महेश जगताप सर, मुख्याध्यापक जगदाळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.. याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने जाधव सर जगदाळे सर महेश सर यांचा सत्कार करण्यात आला.