ग्रामपंचायत कार्यालय अंधापुरी घाट येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन संपन्न.!
बीड दि,२७- बीड तालुक्यातील अंधापुरी घाट येथे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गावच्या सरपंच श्रीमती मनीषा पप्पू जगताप यावेळी उपस्थित होत्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली यावेळी अंधापुरी घाट चे उपसरपंच बाळू टेकडे,माझी सरपंच,सदस्य,पत्रकार दिपक वाघमारे तसेच गावातील ग्रामस्थ,प्रतिष्ठित नागरिक,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,ग्रामरोजगार सेवक,संगणक चालक,ग्रामपंचायत कर्मचारी,जि प प्रा शाळेचे सह शिक्षक जाधव सर,जगदाळे सर,महेश जगताप सर व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.