शिवसंग्राम महाराष्ट्राचा बुलंद आवाज… प्रा.पंडित शेंडगे.
- शिवसंग्राम महाराष्ट्राचा बुलंद आवाज… प्रा.पंडित शेंडगे.
- बीड प्रतिनिधी : स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांनी रायगडावर शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी विविध जाती धर्माचे मावळे बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली व रयतेसाठी स्वराज्य उभे केले हीच प्रेरणा घेऊन लोकनेते मेटे साहेबांनी रायगडावर सर्व जाती धर्मातील मावळ्यांना एकत्रित घेवून दिनांक 06 जानेवारी 2002 रोजी शिवसंग्रामची स्थापना केली व आज शिवसंग्राम संघटना महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आली.ही सामाजिक संघटना जनसेवेसाठी त्याच ताकदीने शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे व आशुतोष विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहे .राज्यसरकारने शिवसंग्रामला घटक पक्ष म्हणून सहभाग नोंदवला हे खऱ्या अर्थाने शिवसंग्रामचे यशोशिखर आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्व.आ.मेटे साहेबांनी सामाजिक क्षेत्रातील प्रश्नावर संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवला विशेष म्हणजे मराठा आरक्षण मिळावे हि मागणी सरकार दरबारी रेटून धरली.मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रिम कोर्टामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करणारी एकमेव शिवसंग्राम संघटना होती हे सबंध महाराष्ट्राने पाहिले.सातत्याने न्यूज चॅनेल, वर्तमानपत्र, सोशल मिडिया व सरकारदरबारी वारंवार प्रश्न उपस्थित करून आरक्षणाचा मुद्दा जिवंत ठेवण्यात शिवसंग्राम व स्व.मेटे साहेबांचे अमूल्य योगदान आहे समाजातील विद्यार्थांसाठी संवाद मेळाव्याचे आयोजन केले गेले यामध्ये सारथी,कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यामधून विद्यार्थास उपलब्ध होणाऱ्या सुविधा विद्यार्थाच्या शंकाकूशंकांना चर्चेच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली चिंताग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे काम शिवसंग्राम व त्यांच्या टिमने केले.५ मे २०२१ रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले तेव्हा शिवसंग्रामच्या माध्यमातून आमदार विनायकराव मेटे यांनी खंडपीठ न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल करून मराठा तरुणांना ईडब्लूएस आरक्षण तात्काळ लागू करण्यासाठी राज्य सरकारला कोर्टात खेचले तेव्हा त्याचा परिणाम ईडब्लूएस आरक्षण मराठा समाजाला लागू केले.शेतकऱ्यांच्या ओलादुष्काळ प्रश्नावर आवाज उठवला . हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने केली तसेच नवगण राजुरी सर्कल मधील उमरद या ठिकाणी सावा सिड्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने गरिब व गरजवंत शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप केली तसेच जरुड या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा उच्चदाबाने शेतीसाठी पाणी देण्यासाठी वीज मिळावी म्हणून आंदोलन केले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारी एकमेव संघटना हि शिवसंग्राम आहे बीड शहरास पाणी पुरवठा सुरळीत व पुरक व्हावा यासाठी शिवसंग्रामच्या महिला आघाडीच्या वतिने नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला . नागरीकांच्या मुलभूत प्रश्नावर आवाज बुलंद करुन प्रश्न सोडवण्यात आला.पेठबीड मधील रस्त्याचे अर्धवट काम सोडले गेले त्यामुळे नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला…. शिवसंग्रामच्या वतीने माजी नगरसेवक दत्ता गायकवाड यांच्या माध्यमातून याठिकाणी आमरण उपोषण करुन हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. तसेच शहरातील पाणी, वीज, रस्ते, भुयारी गटारे, अश्या विविध प्रश्नावर आवाज उठवून नागरिकांचा हक्क मिळवून देण्यासाठी शिवसंग्रामने वेळोवेळी आवाज उठवला आहे. शिवसंग्राम नेहमीच सामाजिक उपक्रमात सक्रिय आहे… हे आपण सर्वजन पाहत आहोत उसतोड कामगार, मजुर, मुकादम यांच्या प्रश्नावर यापूर्वी मांजरसुंबा येथे शिवसंग्रामच्या वतीने भव्य मेळावा घेण्यात आला, भाववाढी बाबत याठिकाणी आ. मेटे साहेबांनी गर्जना करताच सरकारने भाव वाढवून दिला व शिवसंग्रामच्या आंदोलनाला यश आले.. उसतोड मजूर बहुसंखेने शिवसंग्रामशी जोडला गेला व त्यांच्या कष्टाचा हाचा बहुमान करून त्यांना योग्य मोबदला सरकार दरबारी मिळवून देण्याचं काम शिवसंग्राम संघटनेने केले २६ डिसेंबर 2022 रोजी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे शिवसंग्रामच्या माध्यमातून स्व .आ. विनायकराव मेटे साहेबांच्या पुढाकारातून आयोजन केले गेले व बीडकराना एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक मेजवानी दिली गेली यामध्ये पाच ते सहा हजार तरुणांनी व आबालवृद्धांनी भाग घेतला व बीड शहरामध्ये प्रथमच याची सुरुवात केली गेली हे संपूर्ण श्रेय शिवसंग्राम व शिवसंग्राम मधील सर्व पदाधिकारी व त्यांच्या टीमचे आहे शिवसंग्राम नेहमीच बीडकराच्या आरोग्यासाठी झटते आहे. कोणताही युवक व्यसनाकडे झुकू नये म्हणून यापूर्वी ३१ डिसेंबर या दिवशी प्रबोधनात्मक ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे व्हर्चुअल किर्तन ठेवले व निर्व्यसनी राहण्यासाठी यासारखे अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमाची बीडकरांसाठी ठेवण्यात आली. आजचा युवक सक्षम व्हावा यासाठी विविध रोजगार शिबिराचे आयोजन केले गेले व शेकडो तरुणांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली . स्व.लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांच्या पश्चात यांची सामाजिक परंपरा जोपासण्याचे काम शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे व आशुतोष विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .उद्या साजरा होणाऱ्या वर्धापन दिन या कार्यक्रमास सर्व संग्रामी मावळ्यांनी उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात येत आहे .
error: Content is protected !!