जिल्हा परिषदेसमोरील अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवावे.. शिवसंग्राम.
- जिल्हा परिषदेसमोरील अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवावे.. शिवसंग्राम.
- अनधिकृत अतिक्रमण हटवण्याबाबतचे शिवसंग्राम चालक-मालक संघटनेचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर..
- बीड (वार्ताहर) :– छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जुनी जिल्हा परिषद पर्यंतची जागा तत्कालीन मा.जिल्हाधिकारी व मा.पोलीस अधिक्षक यांनी शिवसंग्राम चालक मालक संघटने अंतर्गत व्यवसायिकांसाठी गाड्या पार्किंगसाठी पर्यायी जागा दिलेली होती.सदरील जागेवर गेल्या अनेक दिवसापासून काही व्यक्तिीनी अनधिकृतपणे अतिक्रमण करून सदर जागा हि चुकीच्या पद्धतीने भाडयाने देऊन हॉटेल,पान टपरी, दुकानाचे भाडे ते वसुल करत आहेत. यामुळे गाडया पार्किंगसाठी दिलेल्या जागेवर अतिक्रमण केल्याने शिवसंग्राम चालक मालक संघटनेच्या अंतर्गत भाडे तत्वावर असणाऱ्या गाड्या हया रोडवर लागत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसांकडून त्यांना नाहक त्रास होत आहे.
- याबाबतीत आज शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस तथा शहर प्रभारी अनिल भाऊ घुमरे,, शिवसंग्राम सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे व शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांना निवेदन सादर केले.जिल्हा परिषदेसमोरील अनधिकृत अतिक्रमणे हटवुन शिवसंग्राम चालक-मालक संघटनेच्या भाडेतत्वावर चालणाऱ्या वाहनासाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देणेबाबतची विनंती या निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत तात्काळ उचित कार्यवाही अनुसरण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी यावेळी दिले. याप्रसंगी शिवसंग्राम चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संदीप भांबे, उपाध्यक्ष रज्जाक पठाण, मार्गदर्शक मोहन वाघमारे जालिंदर पाखरे, नितीन मुंडे विकास गोटे, राजेश चव्हाण,शंकर मोरे,शेख जमील रफिक काझी, बापूसाहेब पवार,संकेत पाळवदे,विनोद वडमारे,विनोद मस्के, सुनील निसर्गंध, प्रभाकर उगले, अभिमान डोंगरे, बंडू मोरे सोनू गुंजाळ, प्रकाश गायकवाड शेख नबी,अमोल सोनवणे मधुकर राऊत, उल्हास बांगर,बाबासाहेब शिंदे, यांच्यासह चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!