वाल्मिक कराड पोलिसांना शरण..
- वाल्मिक कराड पोलिसांना शरण..
- पुणे : खंडणी प्रकरणातील गुन्हा दाखल असणारा वाल्मीक कराड यानं पुणे शहर पोलिसांकडे सरेंडर केलेय. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. त्यावेळी पुण्यात पोलिसांच्या कार्यालयाबाहेर कराड याच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती.
- केज पोलीस स्टेशनला माझ्याविरोधात खोटी खंडणीची तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी पाषाण येथील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा करावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जर काही सिद्ध झालं तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे सरेंडर होण्याआधी वाल्मीक कराड यांनी सांगितले.
- बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात बीडच्या सुरक्षा व्यवस्थेची राज्यात चर्चा सुरू होती. विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. गेल्या आठवड्यात बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाही निघाला होता. या प्रकरणामुळे विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर आरोपांचा सपाटा लावला होता. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला होता.
- ९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख याची अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. वाल्मीक कराड यानं आत्मसमर्पण केलेय. याप्रकरणातील पाचवा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. तीन आठवड्यांपासून वाल्मीक कराड फरार होता. वाल्मीक कराड याचा शोध घेण्यासाठी सीआयडीने स्पेशल पथके तयार करून मागावर लावली होती, त्याशिवाय त्याचा पासपोर्ट आणि बँक खाती फ्रीज केली होती. सर्व बाजूने अडचणीत आल्यानंतर वाल्मीक कराड यानं शरण येण्याचा निर्णय घेतलाय.
- वाल्मिक कराड शरण येणार याची बातमी सकाळी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. त्यानंतर वाल्मिक कराड याच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात सीआयडी कार्यलयाबाहेर गर्दी केली होती. वाल्मीक कराड हे आरोपी नाहीत. ते खंडणीचा त्यांच्यावर खोटा आरोप, गुन्हा दाखल केला असल्याचे समर्थकांचे म्हणणं आहे. बीड आणि अहमदनगरवरून आलेल्या समर्थकांनी सीआयडी कार्यालयाबाहेर गर्दी जमली होती.
error: Content is protected !!