11.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

रक्तदान शिबिर घेऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा-  नितीन सोनवणे 

  • रक्तदान शिबिर घेऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा-  नितीन सोनवणे 
  • बॅनर बाजी व अनावश्यक खर्चाला टाळून वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर यशस्वी 
  •  बीड प्रतिनिधी – अनेक नेते आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक बॅनरबाजी होर्डिंग, आतिश बाजी करून पैशाचा अपव्यय करतात, या सर्व गोष्टीला फाटा देऊन, समाज उपयोगी व अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे रक्तदान हे श्रेष्ठदान याचे बीड शहरात वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन केला आहे.
  •  काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रातून जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा आहे अशा बातम्या आल्या होत्या, त्याची दखल घेत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून जाणीवपूर्वक रक्तदान शिबिर घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या बीड जिल्हा येथील मध्यवर्ती कार्यालयात सकाळपासूनच रक्तदान शिबिराला सुरुवात झाली यामध्ये शेकडो युवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रक्तदान देऊन आपल्या नेत्याप्रती व समाजाप्रती एक जागरूक नागरिक असल्याची प्रचिती दिली आहे.या शिबिराला जिल्हाभरातून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!