सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण:,ग्रामस्थ आक्रमक..
- सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण:,ग्रामस्थ आक्रमक..
- मस्साजोग येथे रास्ता रोको..करत सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची केली मागणी..
- बीड प्रतिनिधी: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु केला आहे. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी ६ पैकी दोघांना अटक केल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.
- बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे कारने मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगाव जवळ अज्ञातांनी गाडी अडवून कारची तोडफोड करत संतोष देखमुख यांचे अपहरण केले होते. दरम्यान यांच अपहरण करून काल खून करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणाने बीड जिल्हा हादरला असून मस्साजोग येथील ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत.
- ग्रामस्थांचा रास्ता रोको
- दरम्यान याप्रकरणी आता मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक होत आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, ही मागणी घेऊन ग्रामस्थांनी बीड- अंबाजोगाई महामार्ग अडवत मस्साजोग येथे रास्ता रोको केला आहे. दरम्यान यामुळे बीड-अंबाजोगाई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान या प्रकरणाचा मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या प्रकरणाशी संबंध आहे. यातील आरोपींना पुढील ४८ तासात अटक करू; त्यामुळे ग्रामस्थांनी शांतता राखावी, असं आवाहन देखील यावेळी सचिन पांडकर यांनी केल आहे..
- तर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा पथक स्थापन करण्यात आले आहे. धाराशिव बीडमध्ये पथकाकडून शोध सुरू आहे. या दरम्यान केज जवळील तांबवा गावातील शिवारातून जयराम माणिक चाटे (वय २१ रा.तांबवा ता. केज) व महेश सखाराम केदार (वय २१ रा. मैंदवाडी ता.धारुर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी, बीडच्या केज पोलीस ठाण्यात आरोपी सुदर्शन घुले रा.टाकळी ता. केज याच्यासह अन्य पाच आरोपींवर गुन्हा दाखल आहे.
error: Content is protected !!