8.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

सर्व सामान्यांचे लोकनायक आ. सुरेश धस यांना कॅबिनेट मंत्री करून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करावे -ॲड प्रकाश कवठेकर 

  • सर्व सामान्यांचे लोकनायक आ. सुरेश धस यांना कॅबिनेट मंत्री करून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करावे -ॲड प्रकाश कवठेकर 
  • पाटोदा/(प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वमान्य लोकप्रिय आमदार व्यक्तीमत्व म्हणुन सुरेश धस यांची ओळख आहे. गेली तीस वर्षाच्या राजकीय जिवनात त्यांनी आठरापगड जाती धर्माच्या लोकांना न्याय दिला आहे. अशा बहुआयामी आ. सुरेश धस यांना कॅबिनेट मंत्री करून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करावे अशी मागणी डोंगर किन्ही जि प सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक तथा ॲड प्रकाश दादा कवठेकर यांनी केली आहे.
  • आ. सुरेश धस यांनी अनेक सामान्य कार्यकर्ते यांना पं.स.सभापती, जि.प.सदस्य.जि.प. अध्यक्ष नगराध्यक्ष , पक्षाची विविध पदे दिली आहेत. ही पदे देतांना कधीच जातपात पाहिली नाही. तळगळातील घटकांचा विचार करून पदे दिली. आष्टी मतदार संघातील आजपर्यंतच्या इतिहासात आ. सुरेश धस यांच्या एवढा विकासासाठी निधी कोणीही आणलेला नाही. या निवडणुकीत सर्व जाती धर्माचे लोक आ. सुरेश धस यांच्या मागे होतेच परंतु गरजवंत मराठा समाज पूर्ण तकदीने त्यांच्या मागे निवडणुकीत ऊभा होता हे विशेष आहे. आज पर्यंत बीड जिल्ह्याला मराठा समाजाचा पालकमंत्री लाभलेला नाही तेंव्हा विकासाभिम नेतृत्व आ. सुरेश धस यांना भाजपाने महाराष्ट्र राज्याचा मंत्री करुन बीड जिल्हा पालकमंत्री करावे अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. सत्ता आसो वा नसो आ. सुरेश धस हे सतत विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, कर्मचारी व्यापारी, महिला इत्यादीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. प्रत्येक घटकांच्या सुख दुःखात ते सहभागी होतात मतदारसंघातील गावांची व तेथील प्रश्नांची जाण असणारा नेता अशी ओळख आ. सुरेश धस यांची आहे.महाराष्ट्रात महायुतीला विधान सभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे या यशात मराठा समाजाचे मोठे योगदान आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. भाजपा वाढविण्यासाठी आ. सुरेश धस यांनी आहोरात्र मेहनत घेतली आहे. बीड जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लागावेत व सर्व घटकांना न्याय मिळण्यासाठी आ. सुरेश धस यांना मंत्री करून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करावे अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने तसेच जि प सदस्य तथा उद्योजक ॲड प्रकाश दादा कवठेकर यांनी केली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!