मराठा आरक्षण योद्धा तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे
- मराठा आरक्षण योद्धा तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे
- जय शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांची मागणी
- बीड प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचे खरे योद्धा आमदार तानाजी सावंत यांना महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास अथवा महसूल खात्याचे कॅबिनेट मंत्री करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी द्यावी. त्यांना सदरील खाते देऊन महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला न्याय द्यावा अशी जाहीर मागणी जय शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांनी केली आहे.
- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा मतदार संघाचे तरुण तडफदार आमदार तानाजी सावंत हे मराठा समाजाचे खरे शिलेदार आहेत.लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या समवेत मराठा आरक्षणासाठी ते मेटे साहेबाप्रमाणे उघड पणे भूमिका घेऊन मराठा समाजासाठी सत्तेत असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत होते. गरजवंत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळाले पाहिजे ही त्यांची प्रमुख भूमिका होती आणि ठामपणे आहे. आपल्या भूमिकेसोबत ते कधीही परिस्थितीनुसार प्रसंगानुसार स्वतःच्या स्वार्थासाठी बदलणारे नेतृत्व नाहीत. मराठा समाजाच्या पाठीशी कायम उघड भूमिका घेऊन ठाम पाठीशी राहणारे महाराष्ट्रातील एकमेव विधिमंडळातील नेतृत्व म्हणजेच तानाजी सावंत आहेत.तानाजी सावंत यांनी इतर कोणत्याही समाजावर अन्याय केला नाही. सर्व समाजाला न्याय देणारे आणि मराठा समाजासाठी उघडपणे भूमिका घेणारे नेतृत्व आहे. एवढेच नव्हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात अनेकांनी निराश होऊन आत्महत्या केल्या. त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना तानाजी सावंत यांनी कुटुंबप्रमुख प्रमाणे मायेची सावली त्या कुटुंबीयाच्या पाठीशी उभी केली. आत्महत्याग्रस्त कुटुंब या दुःखातून बाहेर पडावे यासाठी सरकारच्या तिजोरीतून जी काही मदत जास्तीत जास्त करता येईल त्यासाठी तर प्रयत्न केलेच याशिवाय स्वतः व्यक्तिगत महाराष्ट्रातील ज्या तरुणांनी मराठा आरक्षण समर्थकांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या अशा कुटुंबीयांपैकी 37 कुटुंबीयांना त्यांनी स्वतः व्यक्तिगत प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली. असे दायित्व आणि दातृत्व असलेल्या नेतृत्व महाराष्ट्रात एकमेव आमदार तानाजी सावंत आहेत यात शंका नाही. त्यामुळेच जय शिवसंग्रामने त्यांना विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणण्यामध्ये प्रमुख भूमिका घेत प्रचाराची धुरा जय शिवसंग्रामने सांभाळली होती. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून यावेत यासाठी त्यांनी इतर मतदारसंघात सुद्धा जाऊन स्टार प्रचारक प्रमाणे भूमिका बजावली. ते उत्कृष्ट संघटक असून समाजबांधणी करण्यामध्ये त्यांचा मोठा हातकंठा आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाला महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये सर्व समाज घटकांचे कल्याण करण्यासारखे ग्रामविकास खाते किंवा महसूल खाते त्यांच्याकडे देऊन या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अशा लोकप्रिय कणखर नेतृत्वाला संधी द्यावी अशी जाहीर मागणी जय शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांनी केली आहे.
error: Content is protected !!