अभिजीत पवार यांना राज्यस्तरीय युवा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर.
- अभिजीत पवार यांना राज्यस्तरीय युवा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर.
- बीड प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील दैनिक बीड माऊली चे मुख्य संपादक अभिजीत पवार यांना राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती सेवा गौरव युवा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा 05 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वा. तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल , 40 बिघा मलकापूर जि. बुलढाणा येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जि. बुलढाणा संस्थापक अध्यक्ष विवेक सुभाष राजापुरे यांनी दिली आहे. क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तसेच आदर्श पत्रकार पुरस्कार म्हणून बीड जिल्ह्यातील अभिजीत पवार यांना राष्ट्रभक्ती सेवा गौरव आदर्श युवा पत्रकार पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आलेला आहे. अभिजित पवार गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असून, त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे.
error: Content is protected !!