डॉ. ज्योतीताई मेटे यांना विधान परिषदेवर संधी द्या – अभिजीत पवार
- डॉ. ज्योतीताई मेटे यांना विधान परिषदेवर संधी द्या – अभिजीत पवार
- बीड प्रतीनिधी – अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर मराठा आरक्षणाची चळवळ जिवंत ठेवणारे लोकनेते स्व विनायक मेटे साहेब यांच्या पत्नी डॉ ज्योतीताई मेटे यांनी विधानसभा अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आहे. उच्चशिक्षित म्हणून ज्योतीताई मेटे यांच्याकडे पाहिले जाते. बीड जिल्ह्यामध्ये विकासाचा व्हिजन घेऊन डॉ. ज्योतीताई मेटे निवडणूकच्या रिंगणामध्ये उतरल्या होत्या. मेटे साहेब यांनी सुरू केलेली व्यसनमुक्ती अभियान ज्योतीताई यांनी पुढे चालू ठेवले आहे. बीड जिल्हा हा व्यसनमुक्त करण्याचा निर्धार ज्योती मेटे यांनी केलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी अनेक वेळा साहेबांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत यानंतर ज्योतीताईंनी सुद्धा अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत. ज्योतीताई मेटे यांना विधान परिषदेवर घेतल्यावर नक्कीच बीडचा विकास होईल. डॉ. ज्योतीताई मेटे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी यावेळी अभिजीत पवार यांनी केलेली आहे. ज्योतीताई मेटे यांना विधान परिषदेवर संधी दिल्यावर बीडचा कायापलट होईल. ज्योतीताई मेटे एक हुशार व्यक्तिमत्व आहेत. मेटे साहेबांनी 10% राजकारण आणि 90% समाजकारण केलेले आहे डॉक्टर ज्योती मेटे सुद्धा साहेबांसारखेच 10% राजकारण आणि 90 टक्के समाजकारण करतील. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक परंपरेनुसार एखाद्या लोकनेत्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबीयांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याची आपली परंपरा आहे. यामुळे ज्योतीताई यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनातून होताना पाहायला मिळत आहे. मेटे साहेबांनंतर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे संपूर्ण जनता आहे. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. लोकनेतेच्या पाठीमागे सर्व समाज बांधव ज्योतीताई यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. बीडचा विकास फक्त ज्योतीताई मेटेच करू शकतात. विधान परिषदेवर घेतल्यावर ज्योतीताई नक्कीच बीडचा विकास करतील. त्यासाठी ज्योतीताई यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी अभिजीत पवार यांनी केलेली आहे.
error: Content is protected !!