नेकनूर स्त्री रुग्णालय खाजगी लॅब वाल्याचे खिसे भरण्यासाठीच का?
अनेक वेळा तक्रार करूनही वैद्यकीय अधीक्षक शांतच का?
खाजगी लॅब वाला डॉक्टरांना जेवणाच्या डब्याबरोबर आणखी काय पुरवतो?
खाजगी लॅब वाला रुग्णालय रात्रंदिवस तळ ठोकूनच ?
नेकनूर प्रतिनिधी – नेकनूर चे स्त्री रुग्णालय म्हणजे बालाघाटावरील रुग्णांना एक सर्व सुविधा देणारे रुग्णालय म्हणून परिचित आहे या ठिकाणी महिलांच्या शस्त्रक्रियेबरोबरच इतरही शस्त्रक्रिया अगदी मोफत केल्या जातात. परंतु, मागील काही महिन्यांपासून या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना रक्त तपासण्या करण्यासाठी बाहेरच्या लॅब वाल्यांना आमंत्रण दिले जाते. यामुळे या ठिकाणी मोफत सुविधा असूनही खाजगी लॅब वाल्याला भरमसाठ पैसा डॉक्टर मार्फत मिळवून दिल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. याबाबत वैद्यकीय अधीक्षक यांना सांगूनही हा प्रकार काही थांबत नसल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून खाजगी लॅब वाला रात्रंदिवस त्या रुग्णालयामध्येच आढळून येतो. मग स्त्री रुग्णालय हे खाजगी लॅब झालं की काय ? तेथील डॉक्टरांना जेवणाची डबे ही पुरवतो, परंतु या डब्याबरोबरच आणखी काही होत की काय अशी चर्चाही ऐकावयास मिळत आहे. बालाघाटावरील मध्य ठिकाण म्हणजे नेकनूर या ठिकाणची बाजारपेठ ही मोठी असल्याने नेकनूर या ठिकाणी लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते त्याचबरोबर महिलांना सुविधा देण्यामध्ये हे रुग्णालय अग्रेसर आहे त्याचबरोबर या ठिकाणी महिलांच्या शस्त्रक्रिया बरोबरच इतरही शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. म्हणून, या रुग्णालयाला चांगले नावलौकिक मिळालेले आहे, परंतु मागील काही महिन्यांपासून रुग्णांच्या रक्त तपासणी बाहेरील खाजगी लॅबचालकाकडूनच करून घेतल्या जात असल्यामुळे हजारो रुपयांचा भुर्दंड रुग्णांना येत असल्याने याबाबत रुग्णांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

त्याचबरोबर हा खाजगी लॅब वाला रात्रंदिवस अगदी झोपायला पण त्या रुग्णालयांमध्ये असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. म्हणून, या खाजगी लॅब चालकाने सरकारी रुग्णालयातच आपली लॅब सुरू केली की काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. येथील रुग्णांना बाहेरच्या लॅब वाल्याकडून मोठा भुर्दंड सहन करावा लागत असल्याची तक्रार येथील वैद्यकीय अधीक्षक यांना अनेक वेळा करून ही हा प्रकार काही बंद होताना दिसत नाही. मग येथील डॉक्टरांचे आणि खाजगी लॅब चालकाचे काय लागेबांधे आहेत. त्याचबरोबर हा खाजगी लॅब चालक येथील डॉक्टरांच्या अगदी पुढे पुढे करताना त्यांना लागणारी वस्तू रुग्णालयात पोच करून देताना जेवणाच्या डब्यापासून ते आणखी काय काय त्यांना नेऊन देतो याबाबत उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे.

तरी जिल्ह्याचे सीएस थोरात साहेबांनी याकडे लक्ष घालून रुग्णांची होणारी लूट थांबवावी अशी विनंती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.