या लढाईत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार – डॉ. ज्योती मेटे
- या लढाईत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार – डॉ. ज्योती मेटे
- बीड (प्रतिनिधी): बीड विधानसभा निवडणुकीसाठी दी. २० रोजी मतदान प्रक्रिया पार पडली गेली पंधरा दिवस प्रचाराची धामधूम सुरू होती. या सर्व कार्यकाळात शिवसंग्राम चे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी त्याचबरोबर लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहते, हितचिंतक यांचे डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी आभार मानले आहेत.
- नुकतेच विधानसभेसाठी मतदान झाले असून गेली पंधरा दिवस प्रचाराची धामधूम सुरू होती. या प्रचार यंत्रणेत शिवसंग्रामच्या मावळ्यांनी मोलाची साथ दिली त्याचबरोबर मुंबई, रायगड, ठाणे, रिसोड, वाशिम, पंढरपूर, इंदापूर सह महाराष्ट्रभरातील शिवसंग्राम चे मावळे या ठिकाणी माझ्या प्रचारासाठी आले आणि रात्रंदिवस मेहनत घेतली. तसेच बीड मधील मतदाराने या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अतिशय मायेने माझं स्वागत केलं या प्रेमाने मी अतिशय भारावून गेलेली आहे. मी बालाघाटची सून आहे या बीडकरांच्या प्रेमाचा, भावनेचा बंद यापुढील काळामध्ये पक्ष किंवा राजकारणाच्या पलीकडे जाऊन जपण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल ,आपण दिलेल्या स्नेहामुळे माझी पुढची वाटचाल करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली आहे. तेव्हा या लढाईत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते असे डॉ. ज्योती मेटे यांनी म्हटले आहे.
error: Content is protected !!