पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ खासदार बजरंग सोनवणे यांचा बालाघाट गाव भेट दौरा..
अंधापुरी घाट या गावाला दिली भेट..
पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे मतदारांना केले आवाहन..
बीड प्रतिनिधी- केज विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ खासदार बजरंग सोनवणे यांचा बालाघाट गाव भेट दौरा संपन्न झाला, यावेळी त्यांनी अनेक गावांना भेटी दिल्या, त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते,पदाधिकारी,मान्यवर उपस्थित होते.
अनेक मान्यवरांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या समवेत खासदार बजरंग सोनवणे यांनी बालाघाटावरील मौजे अंधापुरी घाट या ठिकाणी भेट दिली.
यावेळी पत्रकार दिपक वाघमारे, सरपंच,गावातील प्रतिष्ठित नागरिक,युवक,महिला,वयोवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाकऱ्याच्या वतीने त्यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले तसेच शाल श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
गावाकऱ्यांच्या वतीने अनेक विकास कामाचे मुद्दे तसेच इतर महत्वाचे प्रश्न खासदार सोनवणे यांच्या पुढे मांडण्यात आले यावेळी त्यांनी गावाकऱ्यांचे म्हणणे एकूण घेत सर्व विषय मान्य करत आवाहन केले की,केज मतदार संघातील अनेक महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी-येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे आणि आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी पृथ्वीराज साठे यांना संधी द्यावी..