धनंजय मुंडेंचा परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यात प्रचाराचा झंझावात
- धनंजय मुंडेंचा परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यात प्रचाराचा झंझावात
- पोखरी, वाघाळा, भारज, नांदगाव, सायगाव, सुगाव येथे कॉर्नर बैठकांना सभांचे स्वरूप
- विकासाचा उर्वरित अनुशेष भरून काढणार – धनंजय मुंडे
- परळी वैद्यनाथ- धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा झंजावात सुरूच ठेवला असून आज अंबाजोगाई तालुक्यात त्यांचा हा झंझावात पोखरी, वाघाळा, भारज, नांदगाव, सायगाव, सुगाव या गावांमध्ये बैठकांच्या स्वरूपात पाहायला मिळाला.
- या दौऱ्यात धनंजय मुंडे यांनी कॉर्नर बैठका घेत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. आतापर्यंत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला असून यापुढेही विकासाचा उर्वरित अनुशेष भरून काढण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
- या भागात मागेल तिथे सभागृह, पर्यटन मधून व अन्य योजनेतून मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांचा विकास यांसह अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर अनेक कामे प्रगतीपथावर तर अनेक कामे निधीसह मंजूर करण्यात आली असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
- यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, विलास बापू मोरे, अविनाश मोरे, पम्पू पाटील, रणजित चाचा लोमटे यांसह नांदगाव येथे रामलिंग चव्हाण, अजित दादा गरड, दिगंबर चव्हाण पोखरी येथे महादेव नेऊन, श्रीहरी होळकर, भागवत निकम, नरसिंग निकम, मिलिंद व्हावळे, मन्सूर शेख, वाघाळा येथे नाना भगत, गणेश भगत, चव्हाण उपसरपंच, महादेव वाघमारे, गणपतराव राऊत, मस्केजी, अण्णा शेळके, ऋषी लोमटे, श्रीमंत क्षीरसागर, भारज येथे वसंतराव शिंदे, ताराचंद शिंदे, माणिकराव शिंदे, मनोज शिंदे, विकास शिंदे, हनुमंत शिंदे, ईश्वर शिंदे, सायगाव येथे आजमभाई, हासमी सर, जावेद भाई, फताउल्ला साहेब, खिलाफत अली, असीम भाई, माफीज भाई, कैलास मस्के, जाबेर भाई, सादिक भाई यांसह आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!