परभणी जिल्हा विधानसभा निवडणुकीसाठी वसंत मुंडे यांची जिल्हा सह प्रभारी पदी निवड.
- परभणी जिल्हा विधानसभा निवडणुकीसाठी वसंत मुंडे यांची जिल्हा सह प्रभारी पदी निवड.
- परळी प्रतिनिधी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या शिफारशी वरून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी परभणी ग्रामीण व शहर जिल्हा सह प्रभारी म्हणून ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कोर कमिटी सदस्य नांदेड जिल्हा प्रभारी वसंत मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. वसंत मुंडे यांनी भाजप सेना व त्रिमूर्ती सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार, बोगस खते बियाणे कीटकनाशके मधील भ्रष्टाचार, पदोन्नती बदल्या मधील नियम बाह्य नेमणुका मधील भ्रष्टाचार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचार, ४ हजार शिक्षक भरती मधील एससी एसटी ओबीसी आरक्षण न देता ओपनला जागा देऊन शिक्षक भरती मधील भ्रष्टाचार, कृषी मेळाव्यासाठी कंपनीकडून खंडणी मागून केलेला भ्रष्टाचार, बोगस खत बी बियाणे कीटक नाशके औषधी कंपन्यावर धाडी टाकुन भ्रष्टाचार केला असून अशी अनेक प्रकरणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी भारत सरकारकडे पंतप्रधान राष्ट्रपती विविध केंद्रीय मंत्री तसेच सीबीआय ईडी एसीबी लोकायुक्त एस आय टी महाराष्ट्र शासनाकडे तसेच विधानसभा विधान परिषद लोकसभेत प्रश्न मांडून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस केली आहेत , सर्व स्तरावर काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांचा पाठपुरावा चालू असतो. माझी जलयुक्त शिवार मंत्री पंकजा मुंडे ना.दादा भुसे ना. अब्दुल सत्तार मा. तालुका न्यायालय जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालया पर्यंत पाठपुरावा करून ज्या त्या मंत्र्याला व जबाबदार अधिकाऱ्यांना ज्या त्या वेळेस धडा दिलेला आहे . ओबीसीची जात निहाय जनगणना करा आर्थिक शैक्षणिक सामाजिक राजकीय शासकीय सेवेत विविध निकषांतर्गत जाति निहाय जनगणना करून आरक्षण देण्यासंदर्भात पक्ष मार्फत नियमितपणे काम चालू असते. या सर्व कामाची नोंद घेऊन वसंत मुंडे यांची परभणी जिल्हा सह प्रभारीपदी नियुक्ती विधानसभेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेली आहे, सर्व स्तरावर कामकाजाच्या पाठपुराव्यामुळे अभिनंदन केले जात आहे.
error: Content is protected !!