माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची निवडणुकीतून माघार..!
- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची निवडणुकीतून माघार..!
- बीड प्रतिनिधी:- बीड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बातमी समोर येत आहे,बीड विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे बीड विधानसभा निवडणुकीसाठी क्षीरसागर कुटुंबातील तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते महाविकास आघाडी कडून संदीप क्षीरसागर, महायुतीकडून योगेश क्षीरसागर तसेच जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज दाखल केले होते जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अर्ज माघार घेत आहे असे कळवले आहे. ते नेमके कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
error: Content is protected !!