8.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीचा झेंडा घेवून निघालेला अवलिया.

  • शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीचा झेंडा घेवून निघालेला अवलिया.
  •  ऊसतोड काम करणारा उमेदवार लढवणार केज विधानसभा निवडणूक…
  • बीड प्रतिनिधी:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राजा हा राणीच्या पोटातून नाही तर मतदानाच्या पेटीतून जन्माला येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच विचारला प्रेरित होऊन एका झोपडीत राहणारा सर्वसामान्य ऊसतोड कामगार मराठवाड्यातील केज मतदार संघ येथून या प्रस्थापितांच्या विरोधात रणशिंग फुंकून निवडणुकीच्या रणधुमाळीत सामील झाला आहे.
  • सतीश सुदाम पायाळ शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील एक ज्वलंत नाव. सहा महिने ऊसतोड करणारा हा सर्वसामान्य उमेदवार आहे. गाव खेड्यात वाड्या वस्त्या मध्ये स्वतःच्या सामाजिक कार्यसाठी सर्वांना परिचित आहे. कैक गरजुवंताच्या सेवेसाठी घरावर तुळशी पत्र ठेवून हा कार्यकर्ता लोकांसाठी खंबीर पणे आज ही उभा आहे. मग तो दवाखाना असो वां एखाद्याच घरचं लग्न असो वा कोणाची अंतयात्रा असो सर्वांसाठी तो एक भक्कम खांदा म्हणून उभा राहिला.
  • जातीय,धार्मिक राजकारण खूप झालं. विकासावर बोला, काम दाखवा. आज मतदार संघातील युवकांच्या माथी बेरोजगारी आहे. मतदार संघात अजून ही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. व्यसनाने तरुण पिढी बरबाद होत चाललेली असताना त्यांच्या हातात पुस्तक कसं येईल या साठी योजना आखणार ही त्यांची प्रमुख भूमिका ते स्पष्ट करत आहेत. आज ही मराठवाड्यात शेतकरी फक्त पारंपरिक शेती वर अवलंबून आहे त्याला तंत्रज्ञानाची जोड कशी मिळेल या साठी ते काम करणार आहेत. स्त्रियांना उद्योग क्षेत्रात कडे पुढे आणता येईल या साठी ते योजना आखू अशी त्यांची भूमिका असेल.
  • प्रचारासाठी मोठी यंत्रणा नाही पाठीमागे खंबीर पक्ष नाही पाठीशी फक्त सर्वसामान्य जनता,मित्र परिवार,भाऊ, वडीलधारे,यांच्या प्रेमाच्या संपत्ती वर निवडून येणारच ह्या विश्वासा सोबत ही लढाई चालू राहील. असे त्यांचे मत आहे.
  • मरण पत्करेल परंतु लाचारी आणि गुलामी नाही हा बाणा ठेऊन प्रस्थापितांच्या स्वार्थासाठी वापरला जाणारा शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा झेंडा प्रस्थापितांच्या कैदेतून मुक्त करून हा झेंडा ही निशाणी हे चळवळीचं वादळ प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या झोपडीवर घरावर तसेच विधान सभेवर झळकल्या शिवाय राहणारी नाही असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
  • येणाऱ्या काळात रोजगार,महिला सक्षमीकरण, शिक्षण, उद्योग अशा विविध विकासाच्या कामाचे स्वरूप मतदार संघात करणार आहे. विकासाचा अजेंडा बदलत असून अन्न,वस्त्र, निवारा, आरोग्य,शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा अशा विविध योजनांच्या माध्यमातून विकास करू असा त्यांचा ध्यास आहे.
  • अनेक वेळा मतदारांना भुरळ घालून नेते फसविगिरी करतात तेव्हा आता मतदार हुशार झाला आहे. त्यांना कळून चुकले आहे की आपला फक्त वापर होत आहे म्हणून यावेळी एक मोठा वर्ग आपल्या कडे वळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!