अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर..
बीड जिल्ह्यातील या उमेदवाराचे नाव यादीमध्ये…
मुंबई प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 4 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडीत, फलटणमधून सचिन सुधाकर कांबळे, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारणेर मतदारसंघातून काशिनाथ दाते यांचा समावेश आहे. महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे हे अधिकृत उमेदवार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच 10 जागांच्या बाबतीत निर्णय आज दुपारपर्यंत जाहीर करणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी आज जाहीर केली होती. विशेष म्हणजे पाच जणांना पक्षात प्रवेश देऊन लगेचच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तसेच नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हीला अणुशक्ती नगर विधानसभेसाठी तिकीट जाहीर करण्यात आले आहे. तर झिशान सिद्दिकालाही पक्षप्रवेश देऊन वांद्रे पूर्व येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पहिल्या यादीमध्ये 38 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. महायुतीच्या सूत्रांनी दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागा लढणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी-
बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवाळ
अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
श्रीवर्धन- आदिती तटकरे
अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
उदगीर- संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
वाई- मकरंद पाटील
सिन्नर- माणिकराव कोकाटे
खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
शहापूर- दौलत दरोडा
पिंपरी- अण्णा बनसोडे
कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
अकोले – किरण लहामटे
वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण- शेखर निकम
मावळ- सुनील शेळके
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
हडपसर- चेतन तुपे
देवळाली- सरोज आहिरे
चंदगड – राजेश पाटील
इगतुरी- हिरामण खोसकर
तुमसर- राजे कारमोरे
पुसद -इंद्रनील नाईक
अमरावती शहर- सुलभा खोडके
नवापूर- भरत गावित
पाथरी- निर्णला विटेकर
मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला
गेवराई- विजयसिंह पंडित
निफाड- दिलीप बनकर
फलटन- सचिन पाटील
पारनेर-काशिनाथ दाते