केज विधानसभा मतदारसंघाची शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जाहीर…
बीड प्रतिनिधी – महाराष्ट्र सध्या विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. यामध्येच सध्या जागा वाटपासाठी मोठ्या हालचाली सुरू झाले आहेत, तसेच शरदचंद्र पवार गटांमध्ये अनेकांचे प्रवेश होताना पाहायला मिळत आहे केज मधून शरदचंद्र पवार गटाकडून अंजली घाडगे संगीता ठोंबरे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, परंतु पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे पृथ्वीराज साठे यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवरून पोस्ट करत सांगितले आहे. खूप दिवसापासून संगीता ठोंबरे अंजली घाडगे आणि पृथ्वीराज साठे तळ ठोकून होते. सध्या राज्यामध्ये मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. शरद पवार गटामध्ये अनेकांचे प्रवेश होताना पाहायला मिळत आहे.
भाजप पक्षाला धक्का देत राजेंद्र मस्के यांनी सुद्धा शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे आणि शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉक्टर ज्योती मेटे यांनी सुद्धा शरदचंद्र पवार गटांमध्ये प्रवेश केला आहे अजून सुद्धा बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले नाही नेमकी बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवारी कोणाला जाहीर होते हे सुद्धा पाहणं औचित्याचे ठरणार आहे.