ज्यांनी लोकसभेत दिली पंकजा ताईंना साथ,,त्याच्या पाठीशी आता उभा करु संपूर्ण बालाघाट :- पवन कुचेकर
- ज्यांनी लोकसभेत दिली पंकजा ताईंना साथ,,त्याच्या पाठीशी आता उभा करु संपूर्ण बालाघाट :- पवन कुचेकर
- चौसाळा :- सध्या विधानसभेचे बिगुल वाजले असुन 20 आँक्टोंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असल्याची निश्चित तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बीड विधानसभेसाठी ज्या उमेदवारांने आदरणीय पंकजा ताई मुंडेंना लोकसभा निवडणुकीत सर्वथा मदत केली अशा उमेदवारांच्या पाठी आता भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर हे खंबीरपणे उभे राहतील हे त्यांनी प्रसार माध्यंमाशी बोलतांना सांगीतले आहे. पवन कुचेकर म्हणजे बालाघाटच्या डोंगर रांगेतील तरुण नेत्रुत्व होय,जनसामान्यांचे प्रश्न धडाडीने अर्ध्या रात्री सोडवणारा सच्चा,निस्वार्थी कार्येकर्त्तो म्हणून उभ्या बालाघाटला पवन कुचेकर परिचित आहेत. पवन कुचेकर यांच्या निस्वार्थी जनसेवेची दखल घेऊन भाजपा पक्षाच्या पंकजाताई मुंडे यांनी त्यांना ” भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुकाध्यक्ष पद देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे, आणी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला ईमाने इतबारे काम करुन जनसेवेचा वसा पवन कुचेकर अहोरात्र चालवतात.गत लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडेच्या पाठीशी अवघा बालाघाटचा मतदार आणी तरुणांची फौज उभी करण्यात पवन कुचेकरांचा सिंहाचा वाटा आहे. पंकजा ताई सत्तेत असो वा नसो परंतु पवन कुचेकर सारख्या जनसामान्यांतील कार्यकर्त्यांमुळे पंकजाताई ताईचे कार्य गाव,वाडी,वस्ती, शहरातील नागरिकांपर्यंत पोहचते हे त्रिकालबाधीत सत्य आहे. आत्ताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पंकजाताई मुंडेच्या विजयासाठी पवन कुचेकर यांनी अख्खा परिसर पिंजुन काढत ताईंच्या पारडयात बालाघाटचे मतदान पाडले होते. दलित, वंचित ,कष्टकरी, गावखोर्यात राहणाऱ्या सर्व समाजाच्या नागरिकांच्या सुख:दुखात अहोरात्र धावुन जाऊन फुंकर घालणार्या पवन कुचेकरांच्या शब्दावर बालाघाटची माणसे आपला घरचा माणूस म्हणून विश्वास करतात हे पवन कुचेकर यांनी कमावलेले धन आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडेंचा निसटता पराभव जरी झाला असला तरीही, बालाघाटच्या गाव ,वाडी,तांडा,वस्ती मधल्या नागरिकांचे मतदान फक्त नी फक्त आपल्या ताईंना करण्याच्या आवाहनावरुन ताईंच्या पदरात उभ्या बालाघाटने मताचे दान केले होते हे सर्वश्रुत आहे. लोकसभेच्या मतदाना वेळी अनेक राजकीय नेत्यांनी आदरणीय पंकजाताई यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले होते.आता विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या ज्या राजकीय धुरंधरांनी पंकजाताई साठी कष्ट घेतले आहेत, त्यांच्या साठी आता बालाघाटच्या डोंगररांगेतील। पवन कुचेकरांची खंबीर साथ असणार आहे, ताईंच्या विजयासाठी ज्यांनी काम केले त्यांच्या पाठिशी तरुणांच्या फोजैसह नागरिकांच्या मतदान रुपी आशिर्वादासाठी पवन कुचेकर आता तयार झाले असून,लोकसभेत ज्यांनी दिली पंकजाताईंना साथ,त्यांच्या पाठिशी आता बालाघाट असे प्रतिपादन पवन कुचेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे.
error: Content is protected !!