बीड मतदारसंघात डॉ.योगेश क्षीरसागरांच्या हस्ते ६ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
- बीड मतदारसंघात डॉ.योगेश क्षीरसागरांच्या हस्ते ६ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
- डॉ.क्षीरसागरांचा विकासकामांचा धडाका; सहा कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
- बीडमध्ये डॉ.क्षीरसागरांच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे प्रगतीपथावर
- बीड मतदारसंघामध्ये डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आणला कोट्यवधींचा विकास निधी
- डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या विकासकामातून बदलतोय बीड मतदारसंघाचा चेहरा-मोहरा!
- बीड प्रतिनिधी दि.१४ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय प्रवक्ते तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा करून मतदारसंघात कोट्यवधींचा निधी खेचून आणला आहे. बीड मतदारसंघाचा ५ वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढत डॉ.क्षीरसागर यांनी चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. मागील आठ दिवसात ६ कोटींच्या विकासकामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली असल्याने ठिकठिकाणच्या नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
- प्रगतीपथावर असलेल्या विकासकामांमध्ये पालवण चौक परिसरात योगभूषण कॉलनी, शहेंशावली दर्ग्याच्या मागील बाजूस, प्रभाग क्रमांक २ मधील बारादरी, शिंदे यांचा मला, जुने सावरकर कॉलेज परिसर येथील अंतर्गत गल्ली, पंचशील नगर भागातील त्रिरत्न बौद्ध विहार परिसर, नवीन सरस्वती विद्यालय परिसरातील राधाकिसन नगर, प्रभाग क्र.१३ मध्ये विविध सिमेंट रस्ते व नाली बांधकाम, अंतर्गत ९ रस्ते, हायमास्ट सोलार दिवे बसविणे, हनुमान मंदिर येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम, सिंहगड कॉलनी नं.२ व जटाशंकर गल्ली, जालना रोड परिसरातील सागर हॉस्पिटल गल्ली, फुलाई नगर, कॅनॉल रोड परिसर, अंबिका चौक परिसर, अंकुश नगर परिसरातील नंदनवन कॉलनी, ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर, कबाड गल्ली, पिंगळे गल्ली येथील गवळी समाज मंदिर, संत सावतामाळी सभागृह येथे कंपाउंड वॉल, इमामपूर रोड येथे मांग गारुडी समाजाचे सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या समोर छत बांधकाम, बंकटस्वामी महाविद्यालय परिसरात त्यागी निवास (जैन मंदिर) येथे कंपाउंड वॉल, चांदणी चौक परिसरात ढोर समाजाचे सामाजिक सभागृह, पेठ बीड भागातील लोणारपुरा परिसरात लोणार समाजाचे सामाजिक सभागृह, नाळवंडी नाका परिसरातील शास्त्रीनगर अंतर्गत सिमेंट रस्ता, गांधी नगर परिसरातील वडार समाज वस्ती, मोमीनपुरा भागातील कुरेशी मोहल्ला, धोंडीपुरा भागातील केंडेवाडा गल्लीत पेव्हर ब्लॉक, रस्ता व नाली, क्रांती नगर भागातील छत्रपती कॉलनी, धानोरा रोड भागातील महात्मा फुले नगर, बापूजी नगर या भागातील रस्ते व नाली, पेव्हर ब्लॉकसह सभागृह, बांधकामाचा समावेश आहे. तसेच, ग्रामीण भागात ५ कोटींचा निधी आहे. या सर्व कोट्यवधींच्या कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ठिकठिकाणी डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक, सरपंच आदींची उपस्थिती होती
- ग्रामीण, शहरी भागात बरोबरीने निधी दिला -डॉ.योगेश क्षीरसागर
- उपमख्यमंत्री अजितदादा, पालकमंत्री धनुभाऊ यांच्या माध्यमातून शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा करून वर्षभरात बीड विधानसभा मतदारसंघात ग्रामीण, शहरी भागात आपण बरोबरीने निधी दिला. नुकतेच आठ दिवसात ७ कोटींच्या कामांना सुरुवात केली आहे. नागरिकांना अधिकाधिक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. कामे दर्जेदार करून घेण्यासाठी माझ्यासह यंत्रणेचे लक्ष असते, असे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
error: Content is protected !!