खांडेपारगावचे माजी सरपंच अशोक आमटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- खांडेपारगावचे माजी सरपंच अशोक आमटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- डॉ.योगेश, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांचे रॅली काढून जल्लोषात स्वागत
- बीड प्रतिनिधी दि.९ : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरूच आहे. बीड तालुक्यातील खांडेपारगावचे माजी सरपंच अशोक आमटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा खांडेपारगाव येथे पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.९) उत्साहात पार पडला. ग्रामस्थांच्यावतीने डॉक्टर दाम्पत्याचे फुलांची उधळण करत हलगीच्या तालावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.
- डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड विधानसभा मतदारसंघातील दररोज प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षात प्रवेश करून खंबीर साथ देत आहेत. माजी सरपंच अशोक आमटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या विचाराने प्रेरित होवून डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसमवेत पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचा सत्कार करून डॉक्टर दाम्पत्याने स्वागत केले. यावेळी सरपंच ॲड.राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथपाल जिल्हाध्यक्ष भागवत आमटे, हनुमंत बोरगे, गोविंद खुरणे, पं.स.चे माजी सभापती सखाराम ठोकळ, सरपंच रामेश्वर आनेराव, हरिभाऊ आमटे, नवनाथ सपकाळ, माणिकभाऊ आमटे, मधुकर वाघमारे, राहुल साळुंके, ईश्वर धनवे, माजी सरपंच मसुराम साळुंके, नागापूर खु.चे सरपंच किशोर ढोकणे, मा.सरपंच तुकाराम जाधव, वसंत शिंदे, धर्मराज सोळूंके, अर्जुन अवघड, बाळू आमटे, मिलिंद ठोकळ, रमेश आमटे, धीरज कदम, जगदीश सपकाळ, अशोक वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- डॉ.योगेश क्षीरसागरांसारख्या नेतृत्वाची बीड मतदारसंघाला गरज-अशोक आमटे
- गेल्या दोन वर्षापासून आपण डॉ.योगेश क्षीरसागर व डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांचे राजकीय, सामाजिक कार्य पाहत आलो आहे. मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर नेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची बीड मतदारसंघाला गरज असून आगामी विधानसभा निवडणुकीत आपण त्यांच्या मागे ताकद उभी करणार असल्याचे माजी सरपंच अशोक आमटे यांनी म्हटले आहे.
error: Content is protected !!