9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

नेकनूर रुग्णालय येथे ट्रॉमा केअर सेंटर चालू करा – अशोक शिंदे 

  • नेकनूर रुग्णालय येथे ट्रॉमा केअर सेंटर चालू करा – अशोक शिंदे 
  • नेकनुर प्रतिनिधी : बीड तालुक्यातील नेकनूर येथे सर्व सोयी नियुक्त स्त्री व कुटीर रुग्णालय आहे, नेकनुर गावाची लोकसंख्या 40000 हजार पेक्षा जास्त असून नेकनुर ला परिसरातील 70ते 80 गावाचा रोजचा संपर्क आहे, येथील जाणाऱ्या राज्य महामार्गावर वारववार अपघात होत असून परिसरातील लोक नेकनूर येथे स्त्री व कुटीर रुग्णालय मध्ये उपचारासाठी येत असून त्यांना अपघात झाल्यास पाहिजे ती सुविधा मिळत नसल्याने त्यांना बीड येथे रेफर केले जाते. त्यावेळी अनेकांचे प्राण गेले आहेत तरी अशा वेळी नेकनूर रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर ची अत्यंत आवश्यकता आहे. तरी नेकनूर येते ट्रॉमा केअर सेंटर चालू करण्याची मागणी पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे यांनी केली आहे.
  • बीड जिल्ह्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नेकनुर ची ओळख आहे, येथील आठवडा बाजारात राज्यासह पर राज्यातील व्यापारी, नागरिक येतात, नेकनुर ला परिसरातील 70 ते 80 गावाचा रोजचा संपर्क आहे, त्या मूळे येथे मोठ्या प्रमाणत वर्दळ असते, येथून जवळच सोलापूर ते छत्रपती संभाजी नगर हा मोठा हायवे तर नेकनुर येथून ही राज्य मार्ग आहे या महामार्गावर नेहमीच अपघात होत आहेत, अपघात झाल्यास त्यांना नेकनुर येथील स्त्री व कुटीर रूग्णालयात उपचारासाठी आणल्या नंतर अपघातात जखमी झालेल्यांना येथे कुठलीच अद्यावत सुविधा नसल्याने त्यांना बीड किंवा इतरत्र हलवावे लागत असल्याने अनेकांना वेळेवर उपचार मिळाले नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहे तरी नेकनुर येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे यांनी केली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!