बीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकनेते विनायकराव मेटे यांचे नाव
- बीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकनेते विनायकराव मेटे यांचे नाव
- बीड आयटीआय ला लोकनेते विनायकराव मेटे यांचे नाव
- राज्यमंत्रिमंडळ बैठकीत निर्णय..
- बीड (प्रतिनिधी):- मंत्रालयात आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यात असलेल्या १४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय यांचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या महाविद्यालयांना महापुरुषांचे व संबंधित जिल्ह्यात योगदान दिलेल्या व्यक्तींचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने १४ आयटीआय यांचे नामकरण करुन १४ महान व्यक्तींची नावेदेखील या आयटीआय संस्थेसाठी देऊ केली आहेत. यामध्ये बीडमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांचे नाव देण्यात आले आहे.
- लोकनेते विनायकराव मेटे यांनी आपल्या हयातीमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक लढे उभे केले. बीड मधील शासकीय आयटीआय महाविद्यालयाला नेहमीच त्यांनी सहकार्याची भूमिका ठेवली होती या ठिकाणी असलेल्या वस्तीगृहाचे नूतनीकरण, पिण्याचे पाण्याची व्यवस्था याबरोबरच अनेक समस्या सोडवण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कार्याला स्मरून आज राज्य सरकारने बीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकनेते विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यावर शिक्कामोर्तब केला, यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकनेते विनायकराव मेटे यांच्यावर प्रेम करणा-या चाहत्यांनी एकत्र येत शिवसंग्राम भवन येथे आनंद व्यक्त केला आणि लोकनेते विनायकराव मेटे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन आदरांजली अर्पण करत अभिवादन केले. याप्रसंगी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,शहराध्यक्ष सुहास पाटील मनोज जाधव, सचिन कोटुळे शेषराव तांबे,डॉ. राजेंद्र बंड,योगेश शेळके,सुनील कुटे, ज्ञानेश्वर कोकाटे, हनुमंत पवार,मच्छिंद्र कुटे, शेख आबेद, अक्षय माने, राजेंद्र आमटे,अमजद पठाण, शेख लालाभाई,,शैलेश सुरवसे, हरिश्चंद्र ठोसर, प्रशांत डोरले, राहुल शाहगडकर ,मुकुंद गोरे,राजेश माने,गणेश धोंडरे,कैलास शेजाळ,गणेश साबळे, विजय सुपेकर,सुहास मेटे,कुंदन गायकवाड,हरीश शिंदे
error: Content is protected !!