रवींद्र दळवी यांनी घेतली गुळवे व कांबळे कुटुंबाची सांत्वन पर भेट.!
- रवींद्र दळवी यांनी घेतली गुळवे व कांबळे कुटुंबाची सांत्वन पर भेट.!
- बीड प्रतिनिधी :- बीड तालुक्यातील नेकनूर येथील रहिवासी सोनाजी सर्जेराव गुळवे हे शेतात शेळ्या चारायला गेले असता विजेची तार अंगावर पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना काही दिवसापूर्वी घडली.
- तसेच येळंब घाट येथील रहिवासी विक्रम बळीराम कांबळे यांचा मुलगा शुभम विक्रम कांबळे वय 16 या मुलाचा येळंब घाट येथे कांबळे वस्तीलगत असलेल्या हायवेवर बसच्या धडकेने दुर्दैवी अंत झाला.
- या घटनेची माहिती मिळताच अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव व पंजाब राज्याचे प्रभारी मा.रवींद्र दळवी यांनी गुळवे व कांबळे कुटुंबाची भेट घेऊन दोन्ही कुटुंबाची विचारपूस करून सांत्वन केले, गुळवे व कांबळे कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे, कोणत्याही प्रकारच्या अडचणीत मी तुमच्यासोबत आहे, काळजी करू नका,काही मदत लागली तर मला फोन करा,मी नक्कीच येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.यावेळी पत्रकार दिपक वाघमारे,प्रशांत वंजारे,सामाजिक कार्यकर्ते सतेस पायाळ, मुन्ना दूनघव, कांबळे परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
error: Content is protected !!