छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे 33 कोटी देवाची फलटण सुद्धा फिकी पडते असे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात:- सोनवणे
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे 33 कोटी देवाची फलटण सुद्धा फिकी पडते असे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात:- सोनवणे
- बीड प्रतिनिधी:-विषमतावादी वृत्तीला छत्रपती शिवाजी महाराजांच राज्य म्हणजे समता समानता न्याय बंधुता लोकशाही स्वातंत्र्य या तत्त्वावर आळा घालण्यासाठी चे प्रयत्न आहेत महाराजांचा हा घोर अपमान आहे.
- हा निव्वळ मूर्खपणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत गणरायाची मूर्ती एकत्र तयार करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विकली जात आहे.ऑल इंडिया पॅंथर सेना ही गोष्ट खपवून घेणार नाही. गणपती उत्सव उत्साहात साजरा करत असताना छत्रपतींचे विसर्जन करणार? का असा थेट सवाल नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना बीड यांनी उपस्थितीत केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणरायांची मूर्ती दाखवणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करणे चुकीचे आहे अशी नाराजी बोलून दाखवली आहे. गणपती हे देव असतील तर छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष आहेत. छत्रपतींच्या पराक्रमाने महाराष्ट्राची, स्वराज्याची निर्मिती झाली. परंतु महापुरुषाचं दैवतीकरण करणं म्हणजे त्यांच्या विचारांना संपवणं आहे हा महाराष्ट्रचा अपमान आहे महाराष्ट्राची अस्मितेचे प्रश्न आहे आम्ही याचा निषेध करतो.
- काही खोडसाळ मूर्तिकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत गणरायाची मूर्ती एकत्र बनवली आहे, हे अतिशय निषेधार्थ असून गणपती घेणाऱ्यांनी लक्षात ठेवा आपले राजे महापुरुष होते महाराजांचे विसर्जन करणं म्हणजे विटंबना करणे आहे.
- या मूर्ती बनवण्याच्या पाठीमागचा मास्टरमाईंड शोधून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी राज्य सरकारकडे ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे..!
error: Content is protected !!