जि.प सदस्य पै सतिष आबा शिंदे यांच्या गावभेट दौऱ्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
- जि.प सदस्य पै सतिष आबा शिंदे यांच्या गावभेट दौऱ्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
- पाटोदा प्रतिनिधी :-आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेले जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सतीश आबा शिंदे यांनी सौताडा ,भुरेवाडी, येवलवाडी ,पारनेर शिखरवाडी, धनगर जवळका, चुंबळी आदी गावांमध्ये गाव भेट दौरा संपन्न झाला या दौऱ्यामध्ये मध्ये गावकऱ्यांनी सतीश आबा शिंदे उस्फूर्तपणे स्वागत केले तसेच विविध गावांतर्गत अडचणी कानावर घातल्या, सतीश आबांनी ही लागलीच संबंधित तलाठी यांना सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे संततधार पावसामुळे नुकसान त्याचप्रमाणे पडझड झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले ,तसेच येवलवाडी या ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेस थांबा घेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत महाविद्यालयात जाता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यी, महिला महाविद्यालयीन तरुणी, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर सतीश आबा शिंदे यांनी आगार प्रमुखांना लेखी मागणी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच पाटोदा आगरप्रमुखांना दूरध्वनी करून प्रश्न सोडवण्यासाठी सूचना केल्या. गाव दौऱ्यानिमित्त ठिकठिकाणी गावकऱ्यांनी केलेले स्वागत तसेच मिळालेला प्रतिसाद नक्कीच भविष्यात सकारात्मक बदल घडवेल असं चित्र निर्माण झालं आहे. या गावभेट दौऱ्यानिमित्त स्थानिक नागरिकांनी सतिष आबा यांना यावेळी आमदारकी लढवाच असा आग्रह धरला.भविष्यात आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाला नवा तरुण ,तडफदार चेहरा मिळू शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाटोदा शहरामधील भेट दौऱ्याची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे मताधिपती ह भ प सतीश महाराज उरणकर यांच्या आशीर्वाद घेऊन केले.
error: Content is protected !!