रक्तदान हेच श्रेष्ठ दान:- पॅंथर नितीन सोनवणे.
- रक्तदान हेच श्रेष्ठ दान:- पॅंथर नितीन सोनवणे.
- भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..
- बीड, प्रतिनिधी:-मानवी रक्त कुठल्याही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही ज्यावेळी रक्ताची गरज लागते त्यावेळेस मानवी शरीरातूनच काढून घ्यावे लागते म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे जेव्हा तुम्ही रक्तदान करतात तेव्हा फक्त एकाच रुग्णाला फायदा होतो परंतु जेव्हा तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतात त्यात संकलित झालेल्या रक्तपिशव्यांमुळे शेकडो रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवु शकतात यामुळेच शिबिर आयोजित करणे महत्त्वाचे आहे
- रक्तदान हे अनमोल असे जिवदान आहे आपले रक्तदान एखाद्या गरजवंत रुग्णांना, अपघात ग्रस्ताला जिवदान ठरु शकते, कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज भासेल हे सांगता येतं नाही म्हणूनच रक्तादान करुन समाजाचे ऋण फेडुया हा विचार आपण सर्वांनीच अंगीकारला पाहिजे तसेच रक्तदानामुळे रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्त निर्माण करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना मिळते.
- आपल्या देशात थॅलिसिमिया रुग्ण खुप आहेत त्यांना दर 15 दिवसांनी रक्ताची गरज भासते, रक्तदान करून तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणु शकता. म्हणून सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले पाहिजेत. त्याच अनुषंगाने आज बीड शहरामध्ये सिटी ब्लड बँक या ठिकाणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बीड जिल्ह्यातील संघटनेतील कार्यकर्ते पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित राहून या असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले.
- यावेळी नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना, सूर्यकांत ठोकळ, अनिल वीर, विनोद सवाई, आकाश ढोकणे, आकाश वारभुवन, सुरज वाघमारे, वसीम भैया शेख, कावेरी जाधव, संघटनेतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!