- जि.प.प्रा शाळा अंधापुरी घाट येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन..!
- 🔲 उपसंपादक-दिपक वाघमारे
- बीड दि,१: बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे जि.प.प्रा शाळा या ठिकाणी लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
- प्रभावी लेखणीतून,अनमोल वाणीतून वंचितांच्या व्यथा प्रखरपणे मांडणारे साहित्यिक,लेखक,समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बुलंद आवाज लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी जि प प्रा शाळा अंधापुरी घाट येथे मोठ्या उत्साहात साजरी करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
- यावेळी जि प प्रा शाळेचे सहशिक्षक जाधव सर,गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच वाघमारे मित्र मंडळ उपस्थित होते.