सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जंयती निमीत्त, “जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मज भिमराव, मशाल क्रांती मार्च”
- सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जंयती निमीत्त, “जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मज भिमराव, मशाल क्रांती मार्च”
- बहुसंख्येने सहभागी व्हा – विनोद (दादा) हातागळे
- बीड प्रतिनिधी:- सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त बीड शहरात 01 ऑगस्ट 2024 सकाळी 10.00 वा. डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या पर्यंत जग बदल बालुनी घाव, मज सांगुनी गेले भिमराव मशाल क्रांती मार्च काढण्यात येणार आहे तरी बीड शहरातील तमाम जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन बलभीम नगर , पेठ बीड जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद दादा हातागळे यांनी केले आहे.
- प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांनी आपले सारे जिवन सामान्य गोरगरीब जनतेल जागृत करण्यासाठी घालवले, अनेक संघर्ष केले या मध्ये आण्णाभाऊ साठे यांना जातीवादाचे चटके सहन करावे लागले, याच त्यांच्या शेवटच्या काळा त्यांनी फकिरा ही कांदबरी लिहली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला अर्पण केली व संदेश दिला की जग बदलण्याची ताकद फक्त डॉ. आंबेडकरांच्या विचारधारेत आहे, जो पर्यंत जातीय व्यवस्था उध्वस्त होत नाही, तो पर्यंत दलित जनतेवरील अन्याय दुर होणार नाहीत, म्हणुन जातीय व्यवस्थेवर घाव घाला असा संदेश सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांनी दिला, याच संदेशाचा प्रचार आणी प्रसार व्हावा या उद्देशाने या क्रांती मशाल मार्च चे आयोजन करण्यात आले आहे, तरी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती बलभीमनगर , पेठ बीड यांनी केले आहे.
error: Content is protected !!