24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

स्वामी विवेकानंद आश्रम शाळा याची मान्यता रद्द करा व त्या शिक्षकाला फाशी द्या- पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे.

  • स्वामी विवेकानंद आश्रम शाळा याची मान्यता रद्द करा व त्या शिक्षकाला फाशी द्या- पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे.
  • दलित विदयार्थ्यांचं हत्याकांड….
  • बीड प्रतिनिधी:-अरविंद खोपे, वय -13 इयत्ता सातवीत शिकणारा मुलगा. उराशी स्वप्न बाळगून आई वडिलांनी त्याला लातुर ला शिक्षणासाठी आश्रम शाळेत पाठविले, स्वामी विवेकानंद आश्रम शाळा,आपला मुलगा मोठा होऊन गरिबी दुर करेल हे स्वप्न आई वडिलांचे होते. आईवडील मिळल ते काम करून उपाजीविका भागवीत आहे. वडील मुंबई मध्ये कामासाठी माझा अरविंद मोठा होऊन, घराण्याच नाव उज्ज्वल करेल या स्वप्नात वावरत होते.
  • आश्रम शाळेत अरविंद ची परीक्षा आहे म्हणुन आई वडिलांनी पांगरी(परळी, जि-बीड)येथून अरविंद ला आश्रम शाळेत लातुर ला सोडले, काल दिनांक 29/07/2024 रोजी अरविंद च्या आई वडिलांना शिक्षकांनी अरविंद च्या आई वडिलांना फोन केला. तुमच्या अरविंद च्या पोटला काहीतरी लागलंय त्याच्या पोटातून रक्त येताय, आश्रम शाळेपासून गाव दुर असल्यामुळ नातेवाईकांना तिथं पाठवलं.तर शिक्षकांनी सांगितलं अरविंद पळून गेला. दुपारी आई वडिलांना फोन धडाकाला अरविंद पळून गेला.अरविंद चा शोधाशोध घेत असताना आश्रम शाळेतील एका बाथरूम मध्ये मृत्यूदेह लटकट होता, सुनियोजित कट असुन,अतिशय थंडागर पद्धतीने त्याला मरून टाकान्याय आलं. आणि आज सकाळी (30/07/2024) 03:00 वाजता त्याच आश्रम शाळेतील शिक्षक गुपचूप अरविंद चा मृत्यूदेह खाली उतरून जंगलात तो मृत्यूदेह टाकण्यासाठी निघाले असताना, अरविंद च्या नातेवाईकांनी सकाळी 03:00 वाजता त्या शिक्षकांना रांगेहाथ पकडले. लगेच शिक्षकांनी धूम ठोकून तिथून पळ काढला.
  • आपल्या पोट च्या मुलाचा मृत्यूदेह पाहून आई व नातेवाईक हतबल झालेत, आई घायमोकलुन रडत होती.माझा मुलाला दवाखान्यात न्या, माझ्या मुलगा कसा परत येईल अशी आई ची धडपड चालु होती, कुठं जाऊ! काय करू? माझा मुलगा कसा पुन्हा येईल! पोटच पोरग वेगवेगळी स्वप्न, जगण्याचा आधार,माझं आयुष्य माझा राजा गेला म्हनुन आई रडत होती.वडील मुंबई वरून रात्री निघाले.
  • शिक्षक हा गुरु मनाला जातो, शिक्षेकानेच घात केला. हा घात जातीय भावानेतून केला अशी शंका निर्माण होत आहे. शिक्षकांने विदयार्थ्याला ठार मारलं…
  • अरविंदला न्याय मिळाला पाहिजे, लातुर च्या पोलीस अधीक्षकांनी, लातूरचे पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील यांनी लवकर भेट घटनास्थळी भेट देऊन अरविंद ला न्याय मिळुन देण्याची भूमिका घ्यावी..
  • सकाळी 5 वाजल्यापासून ऑल इंडिया पँथर सेनेची संपूर्ण टीम आश्रम शाळेत दाखल झाली आहे…
  • कायद्याचा धाक राहिलेला नाही, लातुर हे जातीयतेचे, गुन्हेगारांचे केंद्र होत चालेल आहे. सत्ताधाऱ्यांच्या बळावर येते अन्याय वाढत चालले आहेत.
  • कोणत्याही परिस्थितीत आम्ही आरोपीला सोडणार नाहीत. पोलिसांनी तत्काळ छडा लावला पाहिजे अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. व गृहमंत्र्याच्या गाडीला आडवे झोपून न्याय मागितला जाईल.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!