जिल्हाधिकाऱ्यांना चार दिवस झाले आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलनकर्त्यांचं उपोषण सोडायला वेळ नाही मोबाईल ही स्विच ऑफ:- पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे.
- जिल्हाधिकाऱ्यांना चार दिवस झाले आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलनकर्त्यांचं उपोषण सोडायला वेळ नाही मोबाईल ही स्विच ऑफ:- पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे.
- बीड प्रतिनिधी :-तात्काळ बेकायदेशीर रित्या जाणून-बुजून आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या अनुसूचित जातीतील व्यक्तींना टार्गेट करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे.”
- एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना बीड-१. यांच्यामार्फत सन २०२३ रोजी अंगणवाडी सेविका मदतनीस रिक्त पद भरती करण्यात आली. त्यामध्ये घाटसावळी येथील अंगणवाडी मदतनीस रिक्त पद भरती मध्ये बनावट कागदपत्र घेऊन, प्राथमिक यादीमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जास्तीचे गुण देऊन उमेदवारास प्रथम क्रमांक देऊन, सिद्धी दादाभाई सूर्यवंशी यांची फसवणूक केलेली असून शासनाची देखील फसवणूक केलेली आहे. बनावट कागदपत्रा बाबत संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सिद्धी दादाभाई सूर्यवंशी यांनी माहिती देऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत विनंती अर्ज तक्रार केलेले आहे.
- तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी त्याविषयी कोणत्याही प्रकारची योग्य ती कारवाई न करून पद भरती स्थगित ठेवली आहे. यामध्ये संबंधित अधिकाऱ्याची आर्थिक देवाणघेवाण झाली असावी, याची शक्यता नाकारता येत नाही. माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार अर्ज करण्यात आला असता, अर्ज घेण्यास नकार देण्यात आला. व अपमानास्पद वागणूक दिली.
- पंचायत समिती बीड आवकजावक मधून माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केला असता. हे त्यांना कळाले तेव्हा प्राथमिक यादी मधील प्रथम क्रमांकाच्या उमेदवाराला आमच्याबद्दल माहिती दिली. त्यामुळे उमेदवाराच्या पतीने आम्हाला घरी येऊन माहिती अधिकार मागे घेण्याची धमकी दिली व रस्त्यात गाड्या आडव्या लावून मारण्याचाही प्रयत्न केला दिपक तांगडे यांच्या जीवास धोका असून काही बरे वाईट झाल्यास याला पूर्णतः जबाबदार बाल विकास प्रकल्प अधिकारी असतील. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाची देखील फसवणूक केलेली आहे. ही बाब त्यांच्या वरिष्ठ अधिकारी म्हणजेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याही निदर्शनास आणून दिली. त्यांनीही या विषयांमध्ये दुर्लक्ष करून दिशाभूल करून कोणत्याही प्रकारे योग्य न्याय देण्यास प्रयत्न केला नाही. त्यांची देखील आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
- घाटजवळा अंगणवाडी सेविकेला बेकायदेशीर रित्या कोणत्याही प्रकारचा कायदेशीर राजीनामा देण्यात आलेला नसून, देखील बालविकास प्रकल्प अधिकारी व संबंधित गावातील सरपंच,ग्रामसेवक व प्रतिष्ठित ग्रामपंचायतील ठेकेदारांनी मिळून आर्थिक पैशाची देवाणघेवाण करून जातीय द्वेषाने टार्गेट केले व अंगणवाडी सेविकेला कामावरून कमी केले. कारण १४ वित्त व १५ वित्त आयोगानुसार ग्रामपंचायत मध्ये जो निधी येतो. त्या निधीमधून काही टक्के भाग हा अंगणवाडी साठी खर्च करणे गरजेचे असते आणि घाटजवळा अंगणवाडी मध्ये कुठल्याच प्रकारची सोयी उपलब्ध नसल्यामुळे ई ग्राम स्वराज पोर्टलवर पाहणी केली. अंगणवाडीसाठी पैसे खर्च केले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे क्रांती शिंदे या अंगणवाडी सेविकेने सरपंच व ग्रामसेवक यांना विनंती करून अंगणवाडी साठी निधी खर्च करावा सांगितले, असता सरपंच व ग्रामसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून अंगणवाडी सेविकेने वेळोवेळी तक्रार करून अंगणवाडीमध्ये रंगरंगोटी करून घेतली,लाईट फिटिंग करून घेतली,टीव्ही बसून घेतला, टेबल खुर्च्या आणण्यात आल्या व अंगणवाडीसाठी शौचालयाची मागणी केली. सेविका अनुसूचित जातीतील महिला असल्यामुळे तिला त्यांनी सन्मानाची वागणूक दिली नाही व शौचालय बांधण्यात टाळाटाळ केली. कोणत्याही प्रकारचा विनंती अर्ज सरपंच व ग्रामसेवक घेत नाहीत. सरपंच घुमरे, ग्रामसेवक घुमरे, ग्रामपंचायतील काम करणारा ठेकेदारही घुमरे यांची भावकी असल्यामुळे ग्रामसेवक मागील दहा वर्षापासून घाटजवळा ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे.
- १.बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी परिवेक्षिकामार्फत लेक लाडकी योजनेसाठी प्रत्येक फॉर्म मागे शंभर रुपयाची मागणी केली. प्रत्येक फॉर्म मागे शंभर रुपये न दिल्यामुळे. एकही फॉर्म घेण्यात आलेला नाही.
- २.त्यांनी सांगितलेल्या शाखेमध्ये अकाउंट ओपन न केल्यामुळे काही वेळेस मानधन व जळतनासाठी येणारे पैसे अकाउंट वर ट्रान्सफर न करता चेक द्वारे देण्यात येते. जळतानाचे २०% रक्कम ही परिवेक्षिका मागणी करतात २०% रक्कम आपण देत नाही.
- ३.जुने मोबाईल घेऊन नवीन मोबाईल देण्यात आले. नवीन मोबाईलची पावती पोहोच आमच्याकडून घेण्यात आली त्यामुळे अंगणवाडी कार्यकर्तीने देखील जुन्या मोबाईलची पोच मागितली असता ती देण्यात आलेली नाही.
- ४.बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना हलक्या प्रतीच्या जबरदस्तीने साड्या घेण्यास भाग पाडले व त्यासाठी १६०० रुपयाची जबरदस्तीने वसुली केली ती साडी घेण्यास सेविकेने नकार दिला व सोळाशे रुपये देण्यासही नकार दिला. याविषयी माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार याची माहिती मागविले असता बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार घेण्यास नकार दिला.
- याचा राग मनात ठेवून सरपंच, ग्रामसेवक,ग्रामपंचायत,ठेकेदार, गावातील यांचे नाते संबंधी,सन २०२२ मध्ये जी यादी लावण्यात आली होती त्या यादी तील दोन नंबरचे उमेदवार, त्यांचे नातेवाईक व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून प्लॅन करून क्रांती शिंदे यांना टार्गेट करून बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी क्रांती शिंदे यांना घाटजवळा अंगणवाडीतून अंगणवाडी सेविका पदावरून कमी करण्यात आले.
- वरील दोन्ही विषयांमध्ये तात्काळ सखोल चौकशी व्हावी.योग्य त्या व्यक्तीला नियुक्ती पत्र द्यावे. क्रांती शिंदे या महिलेला तात्काळ घाटजवळा अंगणवाडी मध्ये अंगणवाडी सेविका पदावर रुजू करून घ्यावे. व यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ या विषयाची चौकशी करा. प्रकरणी संबंधित अधिकारी यांच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.
- अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे अन्यथा आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी यांच्या गाडीला आडवं झोपुन न्याय घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत.
error: Content is protected !!