ऑल इंडिया पॅंथर सेनेचा माजलगाव तहसील वर धडक मोर्चा.
- ऑल इंडिया पॅंथर सेनेचा माजलगाव तहसील वर धडक मोर्चा.
- बीड जिल्हा दलित अत्याचार घोषित करा.
- राजेगाव येथील बौद्ध शेतमजूर महिलांना मारहाण प्रकरणी पॅंथर चा उद्रेक.
- बीड प्रतिनिधी:-भूमिहीन दलित शेतमजूर महिलांना झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक झाली पाहिजे माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील महिलांना मारहाण व विनयभंग करून त्यांच्यावर अन्याय केला आहे माजलगाव बीड महाराष्ट्रातील घटनांबाबत व मूलभूत प्रश्नांबाबत निवेदन माजलगाव तहसीलदार यांना राजेगाव पिडीतांना न्याय मिळाला पाहिजे आरोपींना अटक झाली पाहिजे पिडीतांना पोलीस संरक्षण द्यावे
- या साठी तहसील कार्यालय माजलगाव येथे मोर्चा काढुन तहसील समोर भाषणे झाले. भाषणा मध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार म्हटले दलित अत्याचार ही राष्ट्रीय संपत्ती घोषीत करा. नैतिकतेच्या आधारावर ग्रहमंत्र्यांनी सर्व प्रकरणांना न्याय द्या अन्यथा पदाचा राजीनामा द्या.
- अन्यथा चार दिवसा नंतर ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने बीड सोलापूर नेशनल हायवे वर रस्ता रोको आंदोलन केले जाईल.
- दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत या महिलांना जिल्हा व तालुक्यातील भूमिहीन दलितांना तात्काळ जमीन द्यावी अल्पवयीन 14 वर्षीय कोल्हाटी समाजाच्या गरीब मुलीवर माजलगाव येथील लॉजवर बलात्काराची घटना गंभीर आहे बेकायदेशीर लॉजिंग बंद करावी आरोपींनवर कठोर कारवाई करून सदरील मुलीला शिक्षण व नोकरीची तरतूद करून तिचे पुनर्वसन करावे.
- विशाळगड दंगलीतील दंगलखोरांना अटक झाली पाहिजे नुकसान झालेल्या ग्रामस्थांचे नुकसान भरपाई देण्यात यावी आरोपीवर युएपीए ॲक्ट अंतर्गत कारवाई करावी महाराष्ट्रात दलित हत्याकांड अत्याचार वाढले आहेत.
- सातारा,येवला,लातूर,सांगोला बीड,अमरावती राज्यभर अत्याचार वाढत आहेत तात्काळ महाराष्ट्र दलित अत्याचार ग्रस्त घोषित करावा 60 वर्षापासून करचुंडी येथील बौद्ध बांधव गायरान जमीन नावावर करण्यासाठी लढत आहेत तात्काळ त्यांना न्याय द्यावा फिलोसिफ,स्वाधार घरकुल योजनेचा सामाजिक न्यायचा निधी इतरत्र वळू नये ती सरसकट द्यावी आजच्या तारखेपर्यंत ताब्यात असलेल्या गायरान जमिनीचे सातबारे देण्यात यावेत. अशा आशयाचे निवेदन माजलगाव तहसीलदार यांच्यामार्फत गृहमंत्री सामाजिक न्याय मंत्री यांना देण्यात आले.
- या धडक मोर्चा ला ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार, विनोद भोळे, अशोक घडवे पाटील,जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे,भीमराव कदम, प्रल्हाद डावरे, मच्छिंद्र पायके, वसीम शेख, मीणाताई लोंढे,अविनाश वाघमारे, सूर्यकांत ठोकळ, विनोद कोरडे, बादल तरकसे, त्रिंबक पायके,व संघटनेतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!