लोकनेते डॉ.बाबुराव जोगदंड यांचा वाढदिवस चौसाळा येथे विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
(बीड प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था गुरु महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरुदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चौसाळा या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बाबुरावजी जोगदंड यांचा वाढदिवस शाळेच्या मैदानावर विविध शैक्षणिक उपक्रमांनी संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष एडवोकेट रामेश्वर जी काशीद प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष सयाजी शिंदे, संस्थेचे शालेय समिती सदस्य उमेश आंधळे, शालेय समिती सदस्य संभाजी आबा जोगदंड, उमेश जोगदंड चेअरमन सेवा सहकारी सोसायटी तसेच घरत नाना ,अविनाश मुंडे ,संभाजी आंधळे ,सिद्धेश्वर हावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. वाढदिवसानिमित्त घरत नाना यांच्यातर्फे शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांना लिहिण्याचे पॅड वाटप करण्यात आले तसेच संभाजी आबा जोगदंड उमेश रावजी आंधळे, उमेश जोगदंड यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना वॉटर बॅग याचं वाटप करण्यात आल्या तसेच शाळेतील शिक्षक वृंदांच्यावतीने अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी संपूर्ण गावातून काढून डॉक्टर साहेबांसाठी परमेश्वराकडे उदंड आयुष्य व यश कीर्ती लाभो असे साकडे घातले पालक वर्गातून व विद्यार्थ्याकडून शुभेच्छा व मनोगतातून डॉक्टर साहेब बद्दल गौरव उद्गार व समाधान व्यक्त करण्यात आले. ग्रंथ दिंडीची सांगता या ज्ञान पंढरीच्या चिमुकल्या वारकऱ्याकडून विविध अभंग भारुड गवळणी व रिंगण अशा विविध उपक्रमांमधून व अभिनय नृत्यातून आपल्या कलागुणांचा अविष्कार दाखवण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक श्रीमंत चौधरी सर यांनी प्रस्ताविका मधून डॉक्टर साहेब यांची शाळेबद्दलची स्वप्न सांगताना शाळेतील प्रयोगशाळा ग्रंथालय क्रीडांगण संगणक कक्ष याबरोबरच गुणवत्ता पूर्ण शिक्षण व सुजान नागरिक घडवण्याबद्दलचं साहेबांचं स्वप्न आम्ही साकार करू अशी ग्वाही दिली व साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री केदार सर ,श्री घोडके सर ,श्री मोटे सर, श्रीमती साबणे ,मॅडम श्री राठोड सर, श्री लिमकर सर ,श्री गुरव सर, श्री वैद्य सर ,बाळासाहेब जाधव यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व शिक्षक वृंदांच्या परिश्रमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा आस्वाद उपस्थित विद्यार्थी पालक मान्यवरांनी घेतला आणि कार्यक्रमाची सांगता झाली