छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया पँथर सेना बीड च्यावतीने विविध उपक्रम राबवून जयंती साजरी.
बीड प्रतिनिधी:- राजर्षी शाहू छत्रपती महाराज महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत आहेत. जातीय विषमते विरूध्द व उच्चनीचते विरूध्द बंड पुकारून सामाजिक समता स्थापन करणारा लोककल्याणकारी राजा..!
महाराष्ट्राच्या समाजिक चळवळीचे नेतृत्व स्वीकारून पददलित समाजाला जागे करून त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्यही त्यांनीच केले. महाराष्ट्राला मार्गदर्शन करत असतानाच तत्कालीन कोल्हापूर राज्याचा सर्वांगीण विकास या महामानवाने घडविला.
राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्याच काळात प्राथमिक शिक्षण घराघरात गेले. उद्योगधंद्यांना भरभराट आली. नवनवीन पेठा वसविण्यात आल्या. शेती व्यवसायाच्या विकासावर आपली आर्थिक प्रगती आहे हे जाणून शेती व्यवसायास उद्योगीकरणाची जोड दिली, तरच आपली चांगली प्रगती होईल असा विचार ते सातत्याने बोलून दाखवत असत. यासाठी शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी महाराजांचे सदैव प्रयत्न असत.
कला व क्रीडागुणांची जोपासना होणे आवश्यक आहे, हे ओळखून कलावंतांना, चित्रकारांना, संगीततज्ज्ञांना, शाहिरांना व मल्लांना त्यांनी राजाश्रय दिला.
राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना जयंती दिनी त्रिवार मुजरा !
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने बीड शहरांमध्ये जिव्हाळा बेघर निवारा आश्रम या ठिकाणी अन्नदान व वृक्षरोपण करून जयंती साजरी केली तसेच बेगर अनाथ विद्यार्थ्यांना पसायदान सेवा प्रकल्प या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्यात आली. यावेळी उपस्थित ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, रोशन धिवार, राजेश चव्हाण, आकाश देवकते पाटील, मधुसूदन मस्के पाटील, सुरज सोनवणे व संघटनेतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.