आरक्षणाचा इतिहास आणि जरांगे पाटलांचा संघर्ष सांगणारा ‘आम्ही जरांगे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.
- आरक्षणाचा इतिहास आणि जरांगे पाटलांचा संघर्ष सांगणारा ‘आम्ही जरांगे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.
- बीड प्रतिनिधी:- बीडमध्ये आज ‘आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा’ या मराठी चित्रपटाच्या टीमची पत्रकार परिषद पार पडली. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी माहिती निर्माते डॉ.दत्ता मोरे यांनी दिली. या चित्रपटात मराठा आरक्षणाचा लढा कधी आणि कसा सुरू झाला. तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा धगधगता इतिहास दाखवण्यात आला आहे. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा शालेय जीवनापासूनचा इतिहास आणि मराठा आरक्षणासाठी केलेला संघर्ष ‘आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटात दाखवण्यात आल्याने लोकांना या चित्रपटातुन आरक्षणाच्या संपुर्ण इतिहासाची माहिती मिळणार आहे अशीही माहिती चित्रपटाच्या टीमकडून देण्यात आली आहे. तर चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट पाहावा असं आवाहन देखील चित्रपटाच्या टीमकडून करण्यात आले आहे.
- तर मराठा आरक्षणासाठी लढा दिलेल्या आण्णासाहेब पाटील, आण्णासाहेब जावळे पाटील आणि यानंतर जरांगे पाटील यांनी केलेल्या संघर्षाची कहाणी देखील दाखवण्यात आली आहे. तरूणांना वेगवेगळ्या क्षेत्रात उभं राहण्यासाठी आणि संघर्षाला सामोरं जाण्यासाठी बळ देणारा हा चित्रपट ठरणार आहे.
- यावेळी चित्रपटाचे निर्माते डॉ.दत्त मोरे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, मराठा समन्वयक गंगाधर नाना काळकुटे पाटील, श्याम पाटील वडजे, धनाजी साकळकर, सी.पी बागल, राजकुमार पाटील, अशोक काळकुटे आदी उपस्थित होते.
- अतिशय रंजक आणि सत्य घटनांवर आधारित असलेला चित्रपट आवर्जुन पाहावा प्रतिक्रिया मराठा बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. तर सर्व जाती धर्मातील लोकांना सहकुटुंब पाहता येईल असा हा चित्रपट आहे.
error: Content is protected !!