ऑल इंडिया पँथर सेनेमुळे महाविकास आघाडीचा राज्यात विजय झाला- दिपक केदार
दलित, मुस्लिम, आदिवासी मतदारांनी राजकीय क्रांती केली…
🔲उपसंपादक-दिपक वाघमारे
बीड प्रतिनिधी:- ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी बीड दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद घेऊन मत व्यक्त केले यावेळी बोलताना..,या निवडणुकीत दलित, आदिवासी, मुस्लिम मतदारांनी संविधान वाचविण्याच्या बाजूने मतदान केले. महाराष्ट्रात दलित, मुस्लिम, आदिवासी, बहूजन घटकांसाठी लढणारी ऑल इंडिया पँथर सेना इंडिया आघाडी सोबत आल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. भाजपने मत विभाजनाचे अनेक प्रयोग राबवले पण त्यांना हाणून पाडण्याचे काम आम्ही केले.
बीड लोकसभा उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यासाठी आम्ही चार सभेला संबोधित केले, यात आष्टी, बीड, शिरूर, अंबाजोगाई समावेश आहे. माझ्या सारख्या लढाऊ प्रामाणिक, स्वाभिमानी, कार्यकर्त्यांनी संविधान वाचवणे, दलित अत्याचार यावर घेतलेली भूमिकेला मतदाराने गांभीर्याने घेतले आहे आणि राजकीय क्रांती झाली. ऑल इंडिया पँथर सेनेच्या जिल्हा अध्यक्ष व सर्व तालुका अध्यक्षांनी निस्वार्थ काम केले त्यांचे आम्ही स्वागत करतो.
आज आम्ही संविधान वाचवू शकलो हे अभिमानाने सांगू शकतो, नरेंद्र मोदी संविधानाला नतमस्तक झाले हे क्रेडिट आमच्या भूमिकेचे आहे. राज्यात झालेल्या राजकीय क्रांतीचे आम्ही शिल्पकार आहोत.
यापुढे भाजपाला छुप्या पद्धतीने मदत करणारे गट आमच्यापुढे टिकणार नाहीत. आम्ही जिकडे सत्ता तिकडे असेल, आंबेडकरी चळवळीने चौथ्या पर्वाचे नेतृत्व मान्य केले आहे हे या निवडणुकीतून सिद्ध झाले.
बीड जिल्ह्यातील जातीय दुराव्याचे वातावरण योग्य नाही. महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा काही कर्मठ विघटनवादी विचारांचा अजेंडा आहे. आंबेडकरवादी आज मोठ्या भाऊ होऊन आवाहन करतोय की, सामाजिक सलोखा अबाधित ठेवा. गावगाड्यात आपला आर्थिक स्त्रोत ऐकमेकांशी आहे तो जपला पाहिजे.
तरुणांनी राजकीय प्रगल्भ झाले पाहिजे. सन्माननीय पंकजाताई मुंडे यांचा पराभव त्यांच्या भाजप नावाच्या पक्षांमुळे झाला. त्या अपक्ष अस्त्या तर निवडून ही आल्या असत्या पण 400 पार चा नारा संविधान बदलून टाकण्यासाठी आहे हे भाजपाने पेरले, त्यामुळे बीड नाही तर देशात याचा परिणाम झाला. स्मृती इराणी मराठा समाजामुळे पडलेली नाही, आयोधेत भाजपा पडली त्याला कारणीभूत मराठा नाही. देशव्यापी भाजप विरोधी लहर पंकजाताई यांच्या पराभवाचे कारण आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्तिगत हताश होऊ नये. अफवा, संभ्रम निर्माण करू नये. जातीमुळे पराभव झाला हे चुकीचे आहे. मुस्लिम, दलित, आदिवासी हे भाजप विरोधात होते त्याचा हा फटका आहे.
येणाऱ्या विधानसभेला आम्ही मुख्य रोल मध्ये असणार आहोत. या निवडणुकीत अनेकांचे अस्तित्व संपले आहे. कितीही बाशिंग बांधून तयार केलं तरी आता अस्त झालेले उगवणार नाहीत. जिंकण्याचे राजकारण, सत्तेचे राजकारण आम्ही अंगीकारले आहे.
अंबाजोगाई केज, उदगीर, मेहकर किंवा माळशिरस या राखीव मतदारसंघातील जागा ऑल इंडिया पँथर सेनेला महाविकास आघाडीने द्यावी अशी आमची रणनीती असेल. लवकरच राज्यव्यापी आधिवेशन घेऊन आम्ही भूमिका जाहीर करू असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे,वसीम शेख, विनोद कोरडे, विनोद वडमारे,वैभव चक्रे, सूर्यकांत ठोकळ,अनिल शेलार, आकाश ढोकणे व संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते.