21.9 C
New York
Tuesday, July 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास आज पासुन सुरुवात..

आज पासुन श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये अवतरणार पंढरी…

 संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास आज पासुन सुरुवात..

श्रीराम कथा प्रवक्ते श्री संत ज्ञानेश्वर माऊली दादा कृपांकित रामायणाचार्य श्री ह भ प समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून गोड श्रीराम कथा…..

बीड प्रतिनिधी – विसाव्या शतकातील एक महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या चोविसाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात ज्येष्ठ शु. 8 , शुक्रवार दि. 14/06/2024 रोजी होणार आहे आणि सांगता जेष्ठ शु. 14 वटपोर्णिमा , शुक्रवार दि. 21/06/2024 रोजी होणार आहेत. बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र चाकरवाडी येथे प्रतिवर्षी सद्गुरू संत वै. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ विविध कार्यक्रम पार पडतात. यंदाही ग्रामस्थ व संस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहास आज पासुन 14 -06-2024 पासुन सुरुवात होणार आहे आणि 21-06-2024 रोजी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. यामध्ये पहाटे चार ते सहा काकडा भजन,6 ते 7 विष्णुसहस्त्रनाम , 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते दुपारी 1 गाथा भजन पार पडेल. दुपारी 2 ते 5 संगीतमय श्रीराम कथा , 5 ते 6 सायंकाळी हरिपाठ, 6 ते 8 अभंग वाणी संगीत भजनाचे आठ दिवस कार्यक्रम होणार आहेत. 8.30 ते 10.30 हरिकीर्तन व त्यानंतर रात्री हरीजागर व भारुड असे कार्यक्रमही होतील. दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये श्रीराम कथा प्रवक्ते श्री संत ज्ञानेश्वर माऊली दादा कृपांकित रामायणाचार्य श्री ह भ प समाधान महाराज शर्मा श्री शेत्र केज यांची श्रीराम कथा होणार आहे. तसेच श्री नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र ताडबोरगाव जिल्हा परभणी यांचा दररोज हरिपाठ होणार आहे. सप्ताहाची सुरुवात मंगल कलश स्थापना, दीपप्रज्वलन, ग्रंथ पूजन, टाळ, मृदंग, विना श्रुतीपूजन, ध्वजारोहण मठाधिपती महंत श्री ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे श्री बंकट स्वामी मठ संस्थान श्री क्षेत्र नेकनुर यांच्या शुभहस्ते पूजाविधी सोहळा संपन्न होऊन या महोत्सवास आरंभ होईल. व्यासपीठ भूषण मृदंग महामेरू श्री ह भ प रामबुवा महाराज काजळे श्री क्षेत्र ताडबोरगाव जि. परभणी यांची पारायण सेवेची सेवा दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये होणार आहे. सप्ताहाच्या प्रारंभी श्री बंकट स्वामी मठसंस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे कीर्तन होईल. त्यानंतर संत पिठाचार्य तथा अखिल भारतीय वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, धर्मगुरू श्री ह भ प अमृताश्रम स्वामी महाराज जोशी श्री क्षेत्र नवगण राजुरी, प्रेम मूर्ती मठाधिपती महंत श्री ह भ प शिवाजी महाराज श्री क्षेत्र नारायण गड, व्याकरणाचार्य श्री ह भ प अर्जुन महाराज लाड गुरुजी श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र होळ, भागवताचार्य श्री ह भ प पद्माकर महाराज देशमुख अमरावती, ज्ञानसिंधू श्री ह भ प संदिपान महाराज शिंदे हासेगावकर अध्यक्ष श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र आळंदी देवाची, तसेच काल्याचे किर्तन वारकरी संप्रदाय भूषण रामायणाचार्य श्री ह भ प रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचे संपन्न होईल. त्यानंतर महाप्रसादिक महापंगती होतील.

होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन तपोनिधी शांतीब्रह्म गुरुवर्य श्री. ह .भ.प महादेव महाराज तात्या श्रीक्षेत्र चाकरवाडीकर यांनी केले आहे. तरी भाविकांनी हरिनाम श्रवणाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती / आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळी चाकरवाडी आणि तपोनिधी शांतीब्रह्म गुरुवर्य श्री. ह.भ.प महादेव महाराज तात्या श्रीक्षेत्र चाकरवाडीकर यांनी केले आहे. सर्व कार्यक्रम सद्गुरु संत श्री माऊली महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र चाकरवाडी येथे पार पडणार आहेत. या सोहळ्यात महाराष्ट्रातील दिग्गज गायनाचार्य व मृदंगाचार्य यांची सेवा लाभणार आहे. या आध्यात्मिक ज्ञानसागराचा लाभ पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली.. 

महाराष्ट्रातील धाकटी पंढरी श्री क्षेत्र चाकरवाडी येथीलसंत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास आज पासुन सुरुवात.. ग्रामस्थ व ह भ प तपोनिधी शांतीब्रह्म गुरुवर्य श्री महादेव महाराज तात्या श्री क्षेत्र चाकरवाडीकर यांच्या वतीने माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या 24 व्या पुण्यतिथी सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. या नामसोहळ्या स्वयंस्फूर्तीने सेवा समर्पित स्वयंसेवक तथा समस्त गावकरी मंडळी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष व्यवस्थाही केली आहे. उत्सव काळात जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने भाविक हजर राहतील, नेकनुर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!