महाराष्ट्राच्या लेकीला गुजरात मधील पतीने दिले घरातून हाकलून..!
आई व लहान मुलीवर उपासमारीची वेळ.!
परळी प्रतिनिधी -परळी तालुक्यातील इंजेगाव येथील अश्विनी वैजनाथ कराड या नवविवाहित महिलेचा विवाह सख्ख्या मामाने एका एजेंटच्या मध्यस्थीने अहमदाबाद गुजरात येथील सोन्याचे व्यापारी जितू प्यारेराजमल जैन मुलासोबत रिवाजाप्रमाणे लाऊन दिला.
जितू जैन नामक भामटा पती सोन्याचा व्यापारी आहे, परंतु तो भाड्याच्या घरात राहत होता . विवाह झाल्या पासून दोन वर्ष अश्विनी जैन/कराड या पत्नी सोबत गुण्यागोविंदाने सुखात संसार केला व व्यवस्थित,चांगल्या पद्धतीने नांदवल्यानंतर दोन वर्षात दोन गोंडस मुलींचा देखील जन्म झाला, पण हळूहळू अश्विनी जैन कराड ला आई-वडिलांकडून पाच लाख रुपये घेणे म्हणून त्रास सुरू झाला, त्यामध्ये पती जितु व ननंद या दोघांचा सक्रिय सहभाग होता. घरात कोंडून ठेवणे, शेजाऱ्यांना बोलू न देणे. मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला पण फरक पडत नसल्याने सासरकडील मंडळीने पुढील पाऊल म्हणून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. मोबाईल वापरावर बंदी आणली गेली. व इथूनच सर्व सुखी संसाराचे वाटोळे होण्यास झाले. अहमदाबाद गुजरात येथिल जितू जैन पती एवढा हुशार की त्याने आधार कार्ड ते सर्व कागदपत्रे पत्नी अश्विनी जैन/ कराड ला मिळूच दिले नाहीत. तीला ते देण्या पासुन वंचित ठेवले. कुठल्याही कामाला आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो तो देखील तिच्याकडून विस्कटून घेला.
व अश्विनी जैनला एका लहान नऊ महिन्याच्या चिमुली सह घराबाहेर हाकलून दिले. तेव्हापासून तिची फरकट चालू आहे.
आई-वडिलांची नाजुक व गरिबीची असल्यामुळे आई-वडील देखील सांभाळण्यास सक्षम नाहीत. न्याय मिळावा म्हणून 498 चा गुन्हा देखील पती जितू जैन यांच्यावर दाखल केला. पण त्याने जमानत मिळवला व आज मोकळा फिरत आहे. कोर्टाच्या तारखेला देखील उपस्थित राहत नाही. उलट अश्विनीच्या भावालाच त्यांनी खोटे केस मध्ये अडकवले. म्हणजे तिला भावाने देखील सपोर्ट करू नये ही आमची भूमिका होती. दोन वर्षापासून कोर्ट कचेरी खर्चामुळे आई-वडिलांना राहते घर विकण्याची वेळ आली आहे. अद्याप या प्रकरणात न्याय मिळाला नाही.
जितू प्यारेराजमल जैन हा सोन्याचा व्यापारी आहे व त्याचे अहमदाबाद गुजरात येथे सोन्याचे दुकान चालवतो आहे. त्याला चार बहिणी देखील आहेत. पतीच्या व ननंदबाईच्या कारस्थानामुळे हा सुखी संसार उध्वस्त झाला आहे. महिलेच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती हालाखीची नाजुक आहे. जावई जितू जैन यांना पैसे देऊ शकली नाही. वडील वॉचमन, भाऊ ट्रक ड्रायव्हर, आई घरकाम करते. आज आई मुलीवर उपासमारीची वेळ आहे. लहान मुलगी सोबत असल्यामुळे तिच्या देखील शिक्षणाचे व राहण्याची समस्या निर्माण झाली आहे.
सध्याही आई व मुलगी न्यायाच्या प्रतीक्षेत असून न्यायालयीन लढाई लढत आहे. मोठी मुलगी आई पासून तोडली गेली आहे व ती पतीकडे अहमदाबाद गुजरात मध्ये आहे, परंतु आध्यप पर्यंत तरी म्हणजे दोन वर्षे झाले महिलेला घटस्फोट मिळत नाही व न्याय पण मिळत नाही. अशी परिस्थिती गेल्या दोन वर्षापासून हे प्रकरण चालु आहे . अन्यायग्रस्त अस्मिता जितू जैन /कराड या महिलेने माध्यमां समोर येऊन आपल्याला न्याय मिळावा असा टाहो फोडला आहे.