राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करा, अमर वाघमोडे,अंकुश गवळी यांचे आव्हान..
बीड प्रतिनिधी:- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31.मे रोजी संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्यात शासनाच्या वतीने अनेक जयंतीच्या शासकीय सुट्ट्या दिल्या गेल्या आहेत, या सुट्टीच्या औचित्य साधून समाजातील अनेक घटकांनी जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो महापुरुषांच्या त्यांनी केलेल्या त्यागाचा व त्यांच्या विचारांच्या आत्मसमान करतात दिनांक 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी देशभरातील सर्व शासकीय कार्यालयात गाव वाडी वस्तीवर राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करून त्यांच्या विचाराचा वसा सर्वसामान्य माणसापर्यंत गेला पाहिजे असे आव्हान युवा नेते अमर वाघमोडे युवा पत्रकार अंकुश गवळी यांनी केले आहे.